TRENDING:

Tips And Tricks : साबणांच्या उरलेल्या तुकड्याचं काय करावं कळत नाही? 'या' 5 स्मार्ट पद्धतीने करा पुन्हा वापर!

Last Updated:
How to reuse leftover soap : घरात आपण वापरत असलेल्या साबण बऱ्याचदा उरतात. आता घरातले सर्वजण वेगवेगळ्या साबण वापरतात. मात्र या सर्व साबणांच्या उरलेल्या तुकड्यांचा वापर कसा करावा हे आपल्याला कळत नाही. आज आम्ही तुम्हाला याचेच काही उपयोग सांगणार आहोत.
advertisement
1/7
साबणांच्या उरलेल्या तुकड्याचं काय करावं कळत नाही? या 5 स्मार्ट पद्धतीने करा वापर
साबणांचे छोटे छोटे तुकडे काही लोक नव्या साबणाला चिकटवून वापरतात, पण बरेच लोक तसे करत नाही, त्यांना ते आवडत नाही. म्हणून हे साबणाचे तुकडे बऱ्याचदा फेकूनच दिले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला या तुकड्यांचा स्मार्ट वापर कसा करायचा ते सांगणार आहोत.
advertisement
2/7
साबणाचे तुकडे तुम्ही कपाटात देखील ठेऊ शकता. यामुळे कपाट आणि ड्रॉवरमध्ये सुगंध पसरेल. उरलेले साबणांचे तुकडे एका पातळ कापडात गुंडाळा आणि ते कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये ठेवा. यामुळे तुमच्या कपड्यांना चांगला वास येईल.
advertisement
3/7
साबणाच्या तुकड्यांचा वापर तुम्ही बाथरूम आणि टॉयलेटमध्येही करू शकता. साबणाचे छोटे तुकडे नायलॉनच्या जाळीत टाकून ती जाळी टॉयलेट फ्लश टँकजवळ लटकवा. यामुळे टॉयलेटमध्ये सुगंध पसरत राहील.
advertisement
4/7
साबणाचा तुकडा तुम्ही शिवणकामाचा खडू म्हणून वापरू शकता. साबण व्यवस्थित कोरडा होऊ द्या. त्यानंतर तुम्ही तो कपड्यावर वापरू शकता. कपडे धुतल्यानंतर साबणाच्या त्यावरच्या खुणाही निघून जातात.
advertisement
5/7
साबणांच्या तुकड्यांपासून तुम्ही लिक्विड हँडवॉशदेखील बनवू शकता. याने तुमचे हँडवॉश खरेदी करण्याचे काहीसे पैसेही वाचतील किंवा हा ऐनवेळी केला गेलेला एक DIY देखील असू शकतो. साबणाचे छोटे तुकडे किसून त्याचा हँडवॉश बनवू शकता.
advertisement
6/7
बऱ्याचदा आपल्या काही कपड्यांची किंवा बॅगची झिप म्हणजेच चेन स्लिप झालेली असते, ती पुन्हा व्यवस्थित लावण्यासाठी तुम्ही साबणांच्या तुकड्यांचा वापर करू शकता. साबणाचा तुकडा झिपरवर घासा आणि ती लावण्याचा प्रयत्न करा. याने तुमचे काम होईल.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : साबणांच्या उरलेल्या तुकड्याचं काय करावं कळत नाही? 'या' 5 स्मार्ट पद्धतीने करा पुन्हा वापर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल