TRENDING:

Weather Alert: वारं फिरलं! थंडी, ऊन की पाऊस? ठाणे, कल्याण डोंबिवलीत आजचं हवामान कसं?

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून ठाणे, कल्याण डोंबिवलीतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
वारं फिरलं! थंडी, ऊन की पाऊस? ठाणे, कल्याण डोंबिवलीत आजचं हवामान कसं?
फेब्रुवारी महिना संपत असतानाच महाराष्ट्रातील हवामानात कमालीची अस्थिरता जाणवत आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून काही भागावर पुन्हा अवकाळी संकट घोंघावत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असून उकाड्याने हैराण केलं आहे. आज 22 फेब्रुवारी रोजी ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यातील तापमानात शनिवार पेक्षा किंचित बदल होऊन आज हवामान उबदार आणि दमट राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32- 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान स्थिर असून 22 -24 अंश सेल्सिअस राहील. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ व निरभ्र राहून उन्हाचा चटका जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडताना आरोग्याची काळजी घ्यावी.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान प्रामुख्याने उष्ण आणि भरपूर सूर्यप्रकाशित राहील. रविवारी कमाल तापमानात वाढ होऊन 36 -38 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20- 22 अंश सेल्सिअस राहील. उन्हाचा चटका वाढत असल्याने दुपारी बाहेर पडताना पुरेसे पाणी पिणे आणि डोके झाकून ठेवणे योग्य ठरेल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान प्रामुख्याने कोरडे, सूर्यप्रकाशित आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. शनिवारपेक्षा आज तापमानात वाढ होऊन किमान तापमान 22 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस राहील. पुढील काही दिवस कडक ऊन असल्याने दुपारच्या वेळी उन्हाचे चटके अधिक जाणवतील, यावेळी शक्यतो बाहेर पडणे टाळावे .
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान अंशतः उष्ण आणि कोरडे असेल. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असेल. मुरबाड व शहापूर तालुक्यातील हवामान एक अंकी असल्याने स्वच्छ, कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33-35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18-20 अंश सेल्सिअस असेल. सकाळच्या वेळी आद्रता कमी असेल, ज्यामुळे कोरडे हवामान जाणवेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: वारं फिरलं! थंडी, ऊन की पाऊस? ठाणे, कल्याण डोंबिवलीत आजचं हवामान कसं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल