TRENDING:

T20 World Cup : घरी जायची हीच ती वेळ... एक सहीने पाकिस्तान स्वत:च्याच सापळ्यात अडकलं!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 स्टेजला सुरूवात झाली आहे, पण पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला आहे.
advertisement
1/8
घरी जायची हीच ती वेळ... एक सहीने पाकिस्तान स्वत:च्याच सापळ्यात अडकलं!
कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्याचा टॉस झाला, ज्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण टॉस सुरू असतानाच पावसाला सुरूवात झाली. पाऊस थांबत नसल्यामुळे अखेर मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
2/8
पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातली मॅच रद्द झाल्यामुळे दोन्ही टीमना 1-1 पॉईंट देण्यात आला आहे. या सामन्याचा निकाल न लागल्यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंडसाठी सेमी फायनलला पोहोचणं कठीण झालं आहे.
advertisement
3/8
सुपर-8 मध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड एकाच ग्रुपमध्ये आहेत. आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचे सामने श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध राहिले आहेत. यातल्या एका सामन्यात जरी पराभव झाला तर पाकिस्तान-न्यूझीलंडचं सेमी फायनलला पोहोचणं कठीण होईल.
advertisement
4/8
पाकिस्तान-न्यूझीलंडने श्रीलंका किंवा इंग्लंडविरुद्धचा सामना गमावला तर त्यांच्या खात्यात 3 पॉईंट्स होतील. तर दुसरीकडे श्रीलंका आणि इंग्लंडने त्यांचे 3 पैकी 2 सामने जिंकले तरी त्यांच्या खात्यात 4 पॉईंट्स येतील. या परिस्थितीमध्ये श्रीलंका आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.
advertisement
5/8
पाकिस्तानचे उरलेले दोन सामने हे पल्लकेले स्टेडियमवर आहेत. इथली खेळपट्टी बॅटिंगसाठी अनुकूल आहे, त्यामुळे पाकिस्तानसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. केन्डी आणि प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी स्पिन बॉलिंगला मदत करणारी होती, ज्याचा फायदा पाकिस्तानच्या बॉलिंगला झाला.
advertisement
6/8
2026 चा टी-20 वर्ल्ड कप हा भारतामध्ये होणार होता, पण पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळी आयसीसीसोबत एका करारावर सही केली. भारताने पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळायला नकार दिला, त्यामुळे भारताचे सामने युएईमध्ये खेळवले गेले.
advertisement
7/8
भारताने पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिल्यामुळे पाकिस्ताननेही टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतात खेळणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आयसीसीने बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यासोबत करार केला. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या आयसीसी स्पर्धांमधले सामने त्रयस्थ ठिकाणी खेळले जातील, असं या करारामध्ये नमूद केलं गेलं.
advertisement
8/8
पाकिस्तानने त्रयस्थ ठिकाणी खेळण्याच्या करारावर सही केली नसती तर आज पाकिस्तानचे टी-20 वर्ल्ड कपचे सामने भारतामध्ये झाले असते. तसंच पावसामुळे सामना रद्द व्हायची आणि वर्ल्ड कपमधून बाहेर व्हायची वेळ पाकिस्तानवर आली नसती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : घरी जायची हीच ती वेळ... एक सहीने पाकिस्तान स्वत:च्याच सापळ्यात अडकलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल