TRENDING:

बीडमध्ये चाललंय काय? कराडच्या माणसांची नार्को टेस्ट अन् महादेव मुंडे यांचा मुलाला मारहाण, परळीत खळबळ

Last Updated:

19 फेब्रुवारी रोजी सोमेश्वर नगर परिसरात अभ्यासिकेला जात असताना प्रणव मुंडे याला एका व्यक्तीने मारहाण केली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी एकीकडे तपास सुरू आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील कुटुंबीय आता दहशतीखाली जगत आहे. मयत महादेव मुंडे यांच्या मुलाला दोन दिवसांपूर्वी मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे महादेव मुंडे हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करण्यात आाली आहे, त्यानंतर हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची दोन वर्षांपूर्वी हत्या झाली होती.  या प्रकरणाचा एसआयटी कडून तपास केला जात आहे.  नुकतीच या प्रकरणीतील आरोपा वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांसह काही आरोपींची नार्कोटेस्ट देखील करण्यात आली आहे. दरम्यान, 19 फेब्रुवारी रोजी सोमेश्वर नगर परिसरात अभ्यासिकेला जात असताना प्रणव मुंडे याला एका व्यक्तीने मारहाण केली आहे.

advertisement

ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलाला दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी मुलाने काहीही कारण नसताना शिवीगाळ केली. तसंच हातातील कडं फेकून मारलं होतं. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुंडे कुटुंबीयांनी या प्रकरणाचा तपास करणारे पंकज कुमावत यांना संपर्क साधला तसंच पोलीस अधीक्षकांना देखील अर्ज दिला आहे.  याप्रकरणी परळी पोलीस स्टेशनमध्ये आता अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

वाल्मिकच्या मुलांकडून जीवाला धोका

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

तसंच, वाल्मीक कराड याच्या टोळीतील काही लोकांना ताब्यात घेतले असून यामुळे वाल्मिक कराड याची मुलं सुशील कराड आणि श्रीगणेश कराड यांच्याकडून माझ्या परिवारातील सदस्य दत्तात्रय मुंडे, अशोक मुंडे, प्रणव मुंडे, पंकज मुंडे, प्रवीण मुंडे आणि माझा भाऊ सतीश फड, वडील भगवान फड यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. माझ्या परिवारातील या सदस्यांबाबत काही अनपेक्षित घटना घडल्यास सुशील वाल्मिक कराड आणि श्रीगणेश वाल्मिक कराड हे जबाबदार राहतील, असा तक्रार अर्ज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षकांना दिला असून आता यावर पोलीस अधीक्षकांनी काय उपायोजना केल्या हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडमध्ये चाललंय काय? कराडच्या माणसांची नार्को टेस्ट अन् महादेव मुंडे यांचा मुलाला मारहाण, परळीत खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल