TRENDING:

Team India : टीम इंडिया आफ्रिका-बांगलादेशला भिडणार, एकाच दिवशी 2 सामने, क्रिकेटचा सुपर संडे!

Last Updated:

रविवारी दोन भारतीय क्रिकेट टीम मैदानात उतरणार आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय टीम टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : रविवारी दोन भारतीय क्रिकेट टीम मैदानात उतरणार आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय टीम टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करेल. सूर्याची टीम विजयासह सेमी फायनलमध्ये आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल, पण त्याआधी टीम इंडियाचा आणखी एक सामना होणार आहे.
टीम इंडिया आफ्रिका-बांगलादेशला भिडणार, एकाच दिवशी 2 सामने, क्रिकेटचा सुपर संडे!
टीम इंडिया आफ्रिका-बांगलादेशला भिडणार, एकाच दिवशी 2 सामने, क्रिकेटचा सुपर संडे!
advertisement

भारतीय क्रिकेट टीम अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कप सुपर 8 सामना खेळेल. हा सामना संध्याकाळी 7 वाजता खेळला जाईल. सलग चार सामने जिंकून भारतीय टीम सुपर-8 मध्ये पोहोचली आहे, तर दक्षिण आफ्रिका देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे दोन्ही टीममध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. भारतीय टीमसाठी चिंतेची बाब म्हणजे या वर्ल्ड कपमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये शून्य रनवर आऊट झालेल्या अभिषेक शर्माचा खराब फॉर्म.

advertisement

रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर 8 सामन्यापूर्वी अभिषेक शर्माच्या फॉर्मबद्दल प्रश्न उपस्थित झाले तेव्हा, कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट उत्तर दिले. 'अभिषेकच्या फॉर्मबद्दल काळजी करणाऱ्यांबद्दल मला काळजी वाटते. ते अभिषेकच्या फॉर्मबद्दल इतके काळजी का करतात? गेल्या वर्षी, अभिषेकने आम्हाला सर्वांना साथ दिली आणि आता आम्हाला त्याला साथ देण्याची गरज आहे,' असं सूर्या म्हणाला. अभिषेकला सलग सामन्यांमध्ये ऑफ-स्पिनर्सनी आऊट केले आहे आणि स्लॉग शॉट्स खेळताना त्याने आपली विकेट गमावली आहे.

advertisement

महिला टीमही मैदानात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

महिला आशिया कप रायझिंग स्टार्सची फायनल टी-20 वर्ल्ड कपच्या आधी होणार आहे. बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि बांगलादेशच्या महिला टीममध्ये सामना होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील फायनल भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सुरू होईल. भारतीय टीम सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरेल. या स्पर्धेत भारतीय टीम जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. राधा यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनू शकते. भारताने सेमीफायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला, तर बांगलादेशने सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला धूळ चारली होती.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : टीम इंडिया आफ्रिका-बांगलादेशला भिडणार, एकाच दिवशी 2 सामने, क्रिकेटचा सुपर संडे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल