डोंबिवलीकरांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना
कल्याण डोंबिवली महानगरपालिका मार्फत मोहिली उंचन केंद्रातून उल्हास नदीचे पाणी उचलले जाते. हे पाणी 150 दशलक्ष लिटर क्षमतेच्या नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात पुरवठा केला जातो.
कधी अन् किती तास पाणीपुरवठा बंद?
मात्र मोहिली उंचन केंद्र आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र येथे विद्युत तसेच यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीची तातडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत तब्बल 9 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
advertisement
'या' भागातील नागरिकांना पाणी कपातीची झळ
या कालावधीत डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागाला पाणी मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आधीच आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल.
नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
