Mahashivratri 2024 : बम बम भोले! महाशिवरात्रीनिमित्त स्वादिष्ट आणि रिफ्रेशिंग 'थंडाई'ची रेसिपी घरी नक्की ट्राय करा
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
8 मार्च रोजी शुक्रवारी देशभरात महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त अनेकजण उपवास ठेवतात. तेव्हा दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहावी यासाठी अनेकजण उपवासाच्या पदार्थां सोबतच रिफ्रेशिंग थंडाई देखील पितात. तेव्हा घरी थंडाई बनवण्यासाठी खास रेसिपी नक्की ट्राय करा.
advertisement
1/5

बाजारात थंडाई बनवण्याचे प्री मिक्स उपलब्ध असतात. परंतु घरी बनवललेया ड्रायफ्रूट्स युक्त थंडाई पिण्याची मजाच वेगळी असते. उपवासाच्या दिवशी थंडाई प्यायल्याने तुम्ही ऊर्जावान राहता आणि पोट देखील भरल्या सारखे वाटते.
advertisement
2/5
थंडाई बनवण्यासाठी तुम्हाला ⅓ कप बदाम, गार्निशिंगसाठी अर्धा कप काजू आणि बदाम, ¼ कप खजूर, ¼ कप सोफ, ¼ कप खसखस, 15 सोललेल्या वेलची, 1 छोटा चमचा काळीमिरी, 2.5 कप साखर, एक चमचा गुलाब जल, दुध इत्यादी साहित्याची आवश्यकता असते.
advertisement
3/5
थंडाई बनवण्यासाठी मोठ्या भांड्यात दूध उकळवायला ठेवा. जेव्हा दूध उकळेल तेव्हा उकळलेल्या दुधात साखर टाका. जेव्हा साखर पूर्णतः दुधात मिक्स होईल तेव्हा गॅस बंद करा.
advertisement
4/5
एका प्लेटमध्ये काळीमिरी, बडीशेप, खजूर, बदामाचे तुकडे, वेलची, खसखस इत्यादी घेऊन त्याला साफ करून घ्या. मग सर्व गोष्टी वेगवेगळ्या बाऊलमध्ये काढून त्यात पाणी टाकून भिजवत ठेवा. एक तास भिजवल्यावर त्यातील पाणी काढून टाका.
advertisement
5/5
भिजवलेल्या सर्व गोष्टी मिक्सर ब्लेंडरमध्ये टाकून पेस्ट तयार करा. मग ही पेस्ट उकळलेल्या दुधात मिसळा. तसेच या दुधात गुलाब जल टाका. अशाप्रकारे ड्रायफ्रूट थंडाई तयार होते. थंडाई गार्निशिंगसाठी तुम्ही काजू बदाम किंवा केसर टाकू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mahashivratri 2024 : बम बम भोले! महाशिवरात्रीनिमित्त स्वादिष्ट आणि रिफ्रेशिंग 'थंडाई'ची रेसिपी घरी नक्की ट्राय करा