सुंदर दिसणारी 'ही' फुलं आहेत विषारी! चुकूनही करू नका स्पर्श, अन्यथा व्हाल आंधळे अन् जाईल जीव
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
भारतामध्ये धार्मिक व औषधी कारणांसाठी फुलांचा उपयोग केला जातो, पण काही फुलं विषारीही असतात. कण्हेरी व रुई या वनस्पतींमधून निघणारं पांढरं दूध डोळ्यांत गेल्यास...
advertisement
1/9

भारतात धार्मिक कार्यांसाठी फुलांचा वापर केला जातो. याशिवाय, फुलं सजावटीसाठीही वापरली जातात, पण काही फुलं अशी असतात की ती जर काळजीपूर्वक तोडली नाहीत आणि त्यातून निघणारं दूध आपल्या डोळ्यात गेलं, तर ते डोळ्यांसाठी खूप धोकादायक ठरू शकतं.
advertisement
2/9
आयुर्वेद डॉक्टर संतोष श्रीवास्तव यांनी लोकल 18 ला सांगितलं की, कण्हेरी किती प्रमाणात दिल्यावर कोणता आजार बरा होतो, याचा कोणताही वैद्यकीय पुरावा अजून उपलब्ध नाही. या झाडाच्या फुलातून निघणारं दूध डोळ्यांसाठी खूप हानिकारक असतं.
advertisement
3/9
या विषारी झाडामध्ये असलेल्या कार्डिओटॉक्सिसिटी (हृदयासाठी विषारी), हेपॅटोटॉक्सिसिटी (यकृतासाठी विषारी) आणि नेफ्रोटॉक्सिसिटी (मूत्रपिंडासाठी विषारी) मुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
advertisement
4/9
कण्हेरीचं बी विषारी असतं. एक जरी बी खाल्लं तरी माणसाचा जीव जाऊ शकतो. कण्हेरीचं विष डिगॉक्सिन नावाच्या औषधासारखं असतं. डिगॉक्सिन हृदयाच्या ठोक्यांची गती कमी करतं, ज्यामुळे माणसावर नकारात्मक परिणाम होतो.
advertisement
5/9
कण्हेरी चुकूनही खाऊ नये, कारण यामुळे अनेक आजार होऊ शकतात आणि तुमचा जीवही जाऊ शकतो. या आजारांमध्ये डिहायड्रेशन (शरीरातील पाणी कमी होणे), मळमळ, उलटी, ब्राडीकार्डिया (हृदयाचे ठोके मंदावणे) इत्यादींचा समावेश होतो.
advertisement
6/9
आयुर्वेद डॉक्टर संतोष श्रीवास्तव यांनी सांगितलं की, रुई एक विषारी झाड म्हणून ओळखलं जातं. रुईचं झाड कुठेही लावलं जात नाही. हे झाड आपोआप कुठेही उगवतं.
advertisement
7/9
जरी हे झाड औषधी गुणांनी परिपूर्ण असलं, तरी त्याच्या फुलातून निघणारं दूध खूप विषारी असतं. जर याचं दूध डोळ्यात गेलं, तर डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकतं.
advertisement
8/9
रुईचं शास्त्रीय नाव कॅलोट्रॉपिस जायगँटिया (Calotropis gigantea) आहे. हे साधारणपणे संपूर्ण भारतात आढळतं. भारतात याचे दोन प्रकार आढळतात - श्वेतार्क आणि रक्तार्क. श्वेतार्कची फुलं पांढरी असतात, तर रक्तार्कच्या फुलांना गुलाबी रंग असतो. हे फूल तोडताना आपण खूप काळजी घ्यायला हवी. नाहीतर ते आपल्या डोळ्यांना नुकसान पोहोचवू शकतं.
advertisement
9/9
या सगळ्या व्यतिरिक्त, रुईच्या झाडाचे विविध भाग शंभरहून अधिक रोगांच्या उपचारात प्रभावी मानले गेले आहेत. उदाहरणार्थ, विंचू चावल्यास, चावलेल्या भागावर रुईचं दूध लावल्याने आराम मिळतो. मात्र, रुईचं दूध डोळ्यांच्या संपर्कात आल्यास माणूस आंधळाही होऊ शकतो, म्हणून औषधी उपचारांसाठी रुईचा वापर जपून करावा. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय त्याचा वापर करू नये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
सुंदर दिसणारी 'ही' फुलं आहेत विषारी! चुकूनही करू नका स्पर्श, अन्यथा व्हाल आंधळे अन् जाईल जीव