TRENDING:

आधी स्वत:शी लग्न, मग घटस्फोट! ही अभिनेत्री आता शोधतेय नवरा; 3000 पुरुषांना केलं रिजेक्ट, सांगितलं नेमका कसा हवा?

Last Updated:
अभिनेत्रीने स्वत:शी लग्न करून 4 वर्षांनी स्वत:ला घटस्फोटही दिला आहे. तेव्हा मला पुरुषाची गरज नाही म्हणणारी ही अभिनेत्री आता नवरा शोधते आहे, तिला कसा नवरा हवा आहे हेसुद्धा तिने सांगितलं आहे.
advertisement
1/5
स्वत:शी लग्न, घटस्फोट! अभिनेत्री आता शोधतेय नवरा; 3000 जण रिजेक्ट, हवा तरी कसा?
मला लग्नच करायचं नाही, असं म्हणून सिंगल राहणाऱ्या कितीतरी महिला असतील. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल काही महिलांनी स्वत:शीच लग्न केलं आहे. त्यापैकीच ही एक अभिनेत्री. जिने आपल्याला आपल्या आयुष्यात कोणत्या पुरुषाची गरज नाही असं सांगत स्वत:शीच लग्न केलं, त्यानंतर घटस्फोटही घेतला आणि आता ती पुरुष लाइफ पार्टनर शोधते आहे.
advertisement
2/5
ही अभिनेत्री आहे कनिष्का सोनी. जिने  देवों के देव महादेव, महाभारत, पवित्र रिश्ता आणि दिया और बाती हम यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. काही वर्षांपूर्वी तिने टीव्ही इंडस्ट्री सोडली. आता ती लॉस एंजेलिसमध्ये राहते. तिने हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याचं तिचं प्लॅनिंग असल्याचं सांगितलं.
advertisement
3/5
कनिष्काने 2022 मध्ये स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. तिने सांगितलं की तिला पुरुषाची गरज नाही आणि ती स्वतःची स्वप्नं पूर्ण करू शकते. पण आता ती वराच्या शोधात आहे. मी 2022 मध्ये स्वतःशी लग्न केलं. आता चार वर्षे झाली आहेत. आता मी स्वतःला घटस्फोट देत आहे"
advertisement
4/5
"मी कधीही क्लबमध्ये जात नाही, मी अजिबात सोशल नाही. मी घरी राहते. मला स्वतःसाठी स्वयंपाक करायला आवडतं. मला ते सर्व आवडतं. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. पण मला असं वाटतं की कोणीतरी माझं आयुष्य माझ्यासोबत शेअर करावं आणि मी किती अद्भुत व्यक्ती आहे हे जाणून घ्यावं"
advertisement
5/5
कनिष्काने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये तिला कोणत्या प्रकारचा नवरा हवा आहे हे तिने सांगितलं आहे. कनिष्का म्हणाली, "तिला असा पुरूष हवा आहे जो तीन ते चार महिन्यांत पश्चिम लॉस एंजेलिसमध्ये तिच्याशी लग्न करेल. तो अत्यंत देखणा आणि गोंडस असावा, उंच असावा, धूम्रपान करू नये, हुक्का घेऊ नये, ड्रग्ज घेऊ नये, दारू पिऊ नये किंवा अपशब्द वापरू नये, शांत असावा, हसत बोलू नये आणि मांसाहार करू नये, निसर्ग आणि अध्यात्मावर लक्ष केंद्रीत करावं, माझी जबाबदारी घ्यावी आणि मला गोंडस मुलं द्यावीत. तिला एक घर आणि एक शांत, आध्यात्मिक जीवन हवं आहे"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी स्वत:शी लग्न, मग घटस्फोट! ही अभिनेत्री आता शोधतेय नवरा; 3000 पुरुषांना केलं रिजेक्ट, सांगितलं नेमका कसा हवा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल