TRENDING:

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीपासून 4 राशींचा भाग्याचा काळ सुरू! कुंभसहित या राशींचे नशीब चमकणार

Last Updated:
Astrology: आज महाशिवरात्री आहे, सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत नाही. यंदाची महाशिवरात्री खूपच खास असणार आहे. यावेळी महाशिवरात्रीला बुधादित्य, शुक्रादित्य आणि लक्ष्मी नारायण असे मोठे राजयोग जुळून येत आहेत. याशिवाय, महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभ राशीत सूर्य, बुध, शुक्र आणि राहू यांचा चतुर्ग्रही योग देखील असणार आहे. ज्योतिषांच्या मते, महाशिवरात्रीला बनणारा हा विशेष संयोग चार राशींसाठी अत्यंत शुभ संकेत देत आहे.
advertisement
1/7
महाशिवरात्रीपासून 4 राशींचा भाग्याचा काळ सुरू! कुंभसहित या राशींचे नशीब चमकणार
मेष - हा शुभ संयोग मेष राशीच्या लोकांसाठी खूपच अनुकूल मानला जात आहे. तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल आणि धनलाभाचे प्रमाण वाढेल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी मिळतील. करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल.
advertisement
2/7
मेष - नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकतं. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. आई-वडिलांसोबतचे तुमचे संबंध आधीपेक्षा अधिक सुधारतील.
advertisement
3/7
कन्या - कन्या राशीच्या लोकांना जमीन-जुमल्याशी संबंधित कामात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. धनधान्याची सहज प्राप्ती होईल. व्यापाराच्या निमित्ताने एखादा लांबचा प्रवास करावा लागू शकतो, जो भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. तुम्ही संयमाने काम कराल आणि तुमच्याविरुद्ध कट रचणाऱ्यांचे डावपेच उधळून लावाल. घरात पाहुण्यांचे स्वागत होईल आणि नाती अधिक घट्ट होतील.
advertisement
4/7
मकर - महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या कृपेने तुमचे बऱ्याच काळापासून रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. पैशांशी संबंधित असलेला मोठा वाद संपुष्टात येईल. अनावश्यक खर्च कमी होतील आणि पैशांची बचत करणं सोपं होईल. या काळात तुम्ही एखाद्या फायदेशीर योजनेत गुंतवणूक करू शकता.
advertisement
5/7
मकर राशीच्या लोकांची आरोग्यातही चांगली सुधारणा होईल. तुम्ही इतरांच्या मदतीसाठी तत्पर राहाल. जवळच्या व्यक्तींच्या साथीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
कुंभ - नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या दोन्ही लोकांसाठी हा काळ फायदेशीर असल्याचे संकेत मिळत आहेत. व्यापारात नफा वाढू शकतो आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. धनप्राप्तीचे चांगले योग आहेत. जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूपच चांगला आहे.
advertisement
7/7
कुंभेच्या लोकांना मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जाऊ शकता. एखादा जुना आणि चांगला प्लॅन अमलात आणण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीपासून 4 राशींचा भाग्याचा काळ सुरू! कुंभसहित या राशींचे नशीब चमकणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल