अरे बापरे! अवघ्या दीड वर्षांच्या मुलाने 'हल्क'ला गिळलं; रिपोर्ट पाहून डॉक्टरही धक्क्यात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Child Swallow Hulk Toy In Stomach : दीड वर्षांच्या मुलाला उलट्या होत होत्या. त्याच्या पोटाचा एक्स-रे रिपोर्ट पाहिल्यावर जे दिसलं त्यावर डॉक्टरांचाही विश्वास बसत नव्हता.
advertisement
1/6

अवघ्या दीड वर्षांचा चिमुकला वंश खेळत होता. अचानक त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला, त्याला उलटीही होत होती. काहीतरी गडबड आहे, असं त्याची आई भाविकाबेनला वाटलं.
advertisement
2/6
त्याला लगेच अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे केला. रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक झाले. डॉ. राकेश जोशी म्हणाले, मुलाच्या पोटात अडकलेला कोणतं तुकडा नाही तर हात, पाय आणि डोकं असलेलं पूर्ण आकाराचं एक कॅरेक्टर होतं.
advertisement
3/6
मुलाच्या पोटात हल्क हे कॅरेक्टर असलेलं एक खेळणं होतं. जे गायब असल्याचं त्याच्या आईच्या लक्षात आलं. तिने वंशला याबाबत विचारलं, तेव्हा त्याने ते खेळणं गिळल्याचं सांगितलं.
advertisement
4/6
आता हे खेळणं वंशच्या पोटातून काढणं आव्हानात्मक होतं. कारण अन्ननलिका आणि पोट याच्या मधे एक वॉल्व असतो, या वॉल्वमधून खेळणं काढणं सगळ्यात मोठं आव्हान होतं.
advertisement
5/6
डॉक्टर म्हणाले, "एंडस्कोपने जेव्हा ते खेळणं पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोटात हवा असल्याने खेळणं घसरत होतं. जर आम्ही खेळणं हात किंवा पाय पकडून खेचलं असतं तर ते वॉल्वमध्ये अडकण्याची शक्यता होती. ज्यामुळे वॉल्वला कायमची दुखापत झाली असती"
advertisement
6/6
त्यामुळे आम्ही घाई न करता अगदी शांतपणे खेळण्याचं डोकं पकडलं आणि अतिशय काळजीपूर्वक वॉल्वमधून बाहेर काढलं. जर हे खेळणं आतड्यांमध्ये गेलं असतं तर आतडं फाटण्याचा धोका होता आणि ऑपरेशनची गरज पडली असती. आता वंश पूर्णपणे ठिक आहे, असं त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
अरे बापरे! अवघ्या दीड वर्षांच्या मुलाने 'हल्क'ला गिळलं; रिपोर्ट पाहून डॉक्टरही धक्क्यात