TRENDING:

उपवासाला घरीच झटपट बनवा भगरीपासून डोसा, पाहा सोपी रेसिपी PHOTOS

Last Updated:
उपवासाच्या दिवशी फराळाचं काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यासाठी आम्ही एक नवी रेसिपी सांगणार आहोत.
advertisement
1/5
उपवासाला घरीच झटपट बनवा भगरीपासून डोसा, पाहा सोपी रेसिपी PHOTOS
सण, उत्सव म्हंटलं की उपवास आणि व्रतवैकल्य आलीच. उपवासाच्या दिवशी फराळाचं काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. साबुदाण्याची खिचडी, भगर हे पदार्थ घरोघरी बनवले जातात.
advertisement
2/5
पण, तुम्ही कधी भगरीपासून बनवलेला डोसा खाल्ला आहे का? या श्रावण महिन्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. वर्ध्यातल्या रुपाली जुवारे यांनी ही रेसिपी सांगितली आहे.
advertisement
3/5
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी कोरडी भगर आणि अर्धा वाटी साबुदाणा घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून बारीक करा. एका बाऊलमध्ये हे मिश्रण घेतल्यानंतर त्यात आवडत असेल तर दही आणि पाणी घालून नेहमीच्या डोस्याप्रमाणे पातळ करावे.
advertisement
4/5
हे मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवा. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आवडीची चटणी बनवून घेऊ शकता.थोड्यावेळानं हे झाकून ठेवलेलं मिश्रण घेऊन नॉनस्टिक पॅनवर डोस्याप्रमाणे पसरवावे. त्यावर तेल लावावे. डोसा शिजल्यानंतर एकदा परतून रोल करून घेतल्यानंतर कुरकुरीत डोसा खाण्यासाठी तयार आहे.
advertisement
5/5
शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरला तर उत्तम. तुम्हाला आवडीची आणि उपवासाला चालेल ती चटणीही तुम्ही सर्व्ह करू शकता.भगरीचा हा डोसा घरातील चिमुकले आणि वृद्ध देखील आवडीने खातात त्यामुळे या श्रावणात उपवासाच्या फराळात ही रेसिपी नक्कीच ट्राय करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
उपवासाला घरीच झटपट बनवा भगरीपासून डोसा, पाहा सोपी रेसिपी PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल