Varn phal Recipe : उन्हाळा स्पेशल हेल्दी आणि चटपटीत रेसिपी, घरीच बनवा विदर्भातील प्रसिद्ध वरनफळ
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
विदर्भातील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे वरनफळ. हेल्दी आणि चटपटीत वरनफळ कसे बनवायचे ते आपण जाणून घेऊयात.
advertisement
1/7

सध्या उन्हाळा सुरू आहे आणि आजारी व्यक्तींची संख्या खूप वाढली आहे. आजारी पडल्यानंतर तोंडाची चव बदलते आणि डॉक्टरही हलके आणि हेल्दी अन्न सेवन करण्याचा सल्ला देतात.
advertisement
2/7
असाच एक विदर्भातील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे वरनफळ. हेल्दी आणि चटपटीत वरनफळ कसे बनवायचे ते आपण जाणून घेऊयात. अमरावती येथील गृहिणी दर्शना पापडकर यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
3/7
साहित्य : 1 वाटी तुर डाळ (शिजवलेली), 1 वाटी गव्हाचे पीठ, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कडीपत्ता, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, लाल तिखट, हळद, धनिया पावडर हे साहित्य लागेल.
advertisement
4/7
कृती : कढईमध्ये तेल घालून गरम होऊ द्यावे. त्यानंतर त्यात जिरे, मोहरी, हिरवी मिरची आणि कांदा घालावेत. कांदा थोडा लालसर होऊ द्यावे. त्यानंतर त्यात मसाले घालावे. मसाले थोडे परतवून घ्यावेत.
advertisement
5/7
लगेच त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर घालावी. फोडणी मऊ होईपर्यंत गव्हाचे पीठ मळून घ्यावे. पीठ मळताना त्यात तेल आणि मीठ घालावे. मळून झाल्यानंतर झाकून ठेवावे.
advertisement
6/7
तोपर्यंत फोडणी मऊ होईल. नंतर त्यात शिजवलेली तूर डाळ घालावी आणि परतवून घ्यावी. त्यात तुम्हाला हवे तेवढे प्रमाणात पाणी घालावे. त्याला 1 उकळी येऊ द्यावी.
advertisement
7/7
तोपर्यंत मळलेल्या पिठाची पोळी करून त्याचे काप करून घ्यावे. दुसरीकडे वरणाला उकळी आली असेल. त्यात ते केलेले काप घालावे आणि त्यालाही 1 उकळी काढून घ्यावी. तुमचे वरणफळ तयार झालेले असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Varn phal Recipe : उन्हाळा स्पेशल हेल्दी आणि चटपटीत रेसिपी, घरीच बनवा विदर्भातील प्रसिद्ध वरनफळ