TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, आता उष्णतेचा वाढणार पारा, हवामान खात्याकडून अलर्ट

Last Updated:
9 फेब्रुवारी रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे आणि उबदार राहणार असून कालच्या तुलनेत दिवसाचे तापमान किंचित वाढलेले राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांतही अशीच उष्णतेची भावना कायम राहणार आहे.
advertisement
1/5
महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल,उष्णतेचा वाढणार पारा,हवामान खात्याकडून अलर्ट
.महाराष्ट्रात सध्या हिवाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी झाली असून उकाड्याला सुरुवात झाली आहे. सकाळी आणि रात्री जाणवणारी थंडी कमी होत चालली असून दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. 9 फेब्रुवारी रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे आणि उबदार राहणार असून कालच्या तुलनेत दिवसाचे तापमान किंचित वाढलेले राहण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी या भागांमध्ये हवामान मुख्यतः कोरडे आणि उष्ण राहणार आहे. सकाळी सौम्य थंडी जाणवेल, मात्र दुपारच्या वेळेत उखाडा जाणवण्याची शक्यता आहे. कमाल तापमान साधारण 31 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, तर किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत सकाळची थंडी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
आज पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि आसपासच्या भागांमध्ये हवामान कोरडे राहील. दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता वाढलेली जाणवेल. कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. हिवाळ्याचा प्रभाव जवळपास संपत चालल्याचे चित्र आहे.
advertisement
4/5
आज मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे राहणार असून दुपारी उखाडा वाढलेला असेल. कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते, तर किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. पुढील काही दिवसांत उष्णतेत हळूहळू वाढ होत राहणार आहे.
advertisement
5/5
एकंदरीतच आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे आणि उबदार राहणार आहे. कुठेही पावसाची शक्यता नाही. थंडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पुढील काही दिवसांत दिवसाचे तापमान हळूहळू वाढत जाण्याची शक्यता असून नागरिकांना उकाड्याचा अधिक अनुभव येऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert : महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, आता उष्णतेचा वाढणार पारा, हवामान खात्याकडून अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल