आज झोप उडालीच नाही? उद्या बनवा फक्कड चहा, 99% लोक आलं घालताना करतात चूक
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Perfect Tea Recipe: भारतातील कोट्यवधी लोकांच्या दिवसाची सुरुवात चहानं होते. अनेकजणांना चहा प्यायला नाही तर सकाळच झाली नाही असं वाटतं. तर काहीजण ताजंतवानं राहण्यासाठी दिवसभरातून 2-3 कप चहा आरामात पितात. परंतु तरीही बऱ्याचजणांचा चहा फसतो, तो मनासारखा होत नाही. म्हणूनच आज आपण चहाची एक लय भारी रेसिपी पाहणार आहोत. त्यामुळे तुमचा चहा कसा होईल...एकदम फक्कड.
advertisement
1/7

चहा कोरा असो किंवा दुधाचा असतो. तो बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. काहीजणांना साधा चहा आवडतो, काहीजणांचा वेलचीचा चहा आवडतो, तर काहीजण आल्याचा चहा पितात.
advertisement
2/7
शरीर कितीही ऊर्जावान करत असला, सुस्ती उडवत असला, तरी चहा आरोग्यासाठी चांगला नसतो असं तज्ज्ञ वारंवार सांगतात. तसंच प्यायचाच असेल तर चहा सकाळी नाश्त्यासोबत पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे ॲसिडिटी होत नाही.
advertisement
3/7
थंडीत आल्याचा चहा प्यावा असं म्हणतात, पण म्हणून एवढं आलं नाही घालायचं की, चहा कडू होईल. कपभर चहात किती आलं घालायचं याचा योग्य अंदाज असायला हवा.
advertisement
4/7
काहीजण पातेल्यात दूध, साखर, चहा पावडर, आलं आणि पाणी एकत्र घेतात. मग पातेलं गॅसवर ठेवून मिश्रण उकळवतात. परंतु या पद्धतीनं चहा चविष्ट होत नाही. कारण सगळे पदार्थ एकत्र घातल्यानं कुठल्याच पदार्थाची पूर्ण चव चहात उतरत नाही. तसंच पाणी न घातल्यास चहा अति दुधाळ होतो.
advertisement
5/7
उत्तम चहा बनवण्यासाठी सर्वात आधी पातेल्यात पाणी, दूध आणि साखर घ्यावी. मिश्रणाला एक उकळी येऊद्या. आता आलं सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे कापा. हे तुकडे जसेच्या तसे चहात घालून मिनिटभर चहा उकळून घ्या. काहीजण आलं एवढं कुटतात की, त्यातला सगळा रस बाहेरच निघून जातो, मग चहा बेचव लागतो.
advertisement
6/7
चहात आलं एकजीव झालं की, चहा पावडर घाला आणि मग 1-2 मिनिटं मिश्रण उकळवा. लक्षात घ्या, जेवढे कप चहा बनवायचाय त्याच प्रमाणात सगळे पदार्थ घ्यायचे.
advertisement
7/7
आलं गरम असतं, त्यामुळे थंडीत उब देतं. आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत मिळते. त्यामुळे थंडीत सर्दी, खोकल्यावर आराम मिळू शकतो. तसंच आल्यातल्या अँटिमायक्रोबियल गुणधर्मांमुळे अंगदुखी आणि सूजेवर आराम मिळतो. आल्यामुळे अन्नपचनही व्यवस्थित होतं आणि उलटी, मळमळ दूर होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
आज झोप उडालीच नाही? उद्या बनवा फक्कड चहा, 99% लोक आलं घालताना करतात चूक