TRENDING:

मधुराने सांगितली झणझणीत अन् टेस्टी वाटणाची सिक्रेट रेसिपी; 15 दिवस टिकेल, अन् व्हा टेन्शन फ्री

Last Updated:
कोकणी भाज्यांचे वाटण हा देखील अनेकदा महिलांमधील चर्चेचा विषय असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोकणी पद्धतीचे झणझणीत आणि टेस्टी वाटण कस बनवलं जाते याबद्दल माहिती देणार आहोत.
advertisement
1/5
मधुराने सांगितली झणझणीत अन् टेस्टी वाटणाची सिक्रेट रेसिपी; 15 दिवस टिकेल
कोकणी खाद्यसंस्कृती वेगवेगळ्या पदार्थांनी श्रीमंत आहे. विशेषत: नॉनव्हेज खाण्यासाठी तर जगभरातील पर्यटक कोकणात येतात. कोकणी भाज्यांचे वाटण हा देखील अनेकदा महिलांमधील चर्चेचा विषय असतो.
advertisement
2/5
त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोकणी पद्धतीचे झणझणीत आणि टेस्टी वाटण कस बनवलं जाते याबद्दल माहिती देणार आहोत, पुण्यातल्या मधुरा जाधव यांनी याबाबत खास माहिती दिली आहे.
advertisement
3/5
कोकणी वाटणासाठी साहित्य : एक वाटी खोबरं,दोन कांदे (मध्यम),2 चमचे तेल पाच ते सहा लसूण पाकळ्याधने, दालचिनी आणि खडा मसाला
advertisement
4/5
वाटण बनवण्याची कृती : पहिल्यांदा कढईत खोबरं 10 मिनिटं भाजून घ्यावे . त्यानंतर कांदा उभा कापून तेलात भाजून घ्यावा, खडा मसाला देखील हलकासा भाजून घ्यावा. लसूण आणि अद्रक हे देखील मिक्सर मधून बारीक काढून घ्यावेत. हे वाटण तयार करत असताना यामध्ये पाणी टाकू नये. या मसाल्यात पाणी न घातल्यास हाच मसाला 10 ते 15 दिवस फ्रिज मध्ये ठेऊन वापरता येऊ शकतो.
advertisement
5/5
हा तयार मसाला कडधान्य,मटन,चिकन,अंडाकरी तसेच इतरही नॉनव्हेज पदार्थ अथवा कोणत्याही ग्रेव्हीसाठी वापरू शकता. या पध्दतीने झटपट रस्साभाजी बनवण्यासाठी तुम्हीही कोकणी गोडं वाटणाचा आस्वाद घेऊ शकता,अशी माहिती मधुरा यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
मधुराने सांगितली झणझणीत अन् टेस्टी वाटणाची सिक्रेट रेसिपी; 15 दिवस टिकेल, अन् व्हा टेन्शन फ्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल