भाजीची मिठाई, एकदम टेस्टी! येत्या रक्षाबंधनाला करा सर्वांचं तोंड गोड, Recipe
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
सणावाराचे दिवस आहेत, त्यामुळे घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात. मात्र सारखे सारखे तेच तेच पदार्थ बनवायला आणि खायलाही कंटाळा येतो. म्हणूनच आता बनवा एक खास पदार्थ. यासाठी जास्त काही करायचं नाहीये, तर आपल्या जेवणातल्या भाजीपासूनच स्वादिष्ट अशी मीठ बनवायची आहे. कशी? पाहूया.
advertisement
1/5

खवा आणि ड्रायफ्रूट्सपासून ही मिठाई अगदी सोप्या पद्धतीनं बनवता येते. येत्या रक्षाबंधन सणाला आपण ती नक्कीच ट्राय करू शकता.
advertisement
2/5
पडवळ भाजी अनेकजणांना आवडत नाही, तर <a href="https://news18marathi.com/lifestyle/recipe/how-to-make-cheese-cake-at-home-see-easy-recipe-in-marathi-video-mspk-1197637.html">काहीजण आवडीने खातात</a>. याच भाजीपासून आपण मिठाई बनवायला शिकणार आहोत.
advertisement
3/5
सर्वात आधी पडवळची साल काढून घ्यायची. मग आतल्या सर्व बिया काढायच्या. गॅसवर पाणी ठेवून त्यात फक्त भाजीचा गर उकळवत ठेवायचा. आता साखरेच्या पाकात हे पडवळ शिजू द्या.
advertisement
4/5
पडवळचा गर छान शिजल्यानंतर थंड होऊद्या. मग त्याला आपण हवा तसा मिठाईचा आकार देऊ शकता. त्यात खवा आणि ड्रायफ्रूट्स घाला. ही मिठाई पाहताच क्षणी <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/how-to-make-crispy-pakoda-without-besan-know-the-recipe-in-marathi-mhpp-1202365.html">तोंडाला अगदी पाणी सुटतं</a>.
advertisement
5/5
इतर मिठाईपेक्षा पडवळ मिठाईची <a href="https://news18marathi.com/lifestyle/karvand-pickle-recipe-mhij-1227987.html">चव वेगळी</a> असते. बाजारात ती जवळपास 30 रुपये पीस दराने विकली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
भाजीची मिठाई, एकदम टेस्टी! येत्या रक्षाबंधनाला करा सर्वांचं तोंड गोड, Recipe