Navratri Special : साबूदाणा वडा आणि खिचडी खाऊन कंटाळा आलाय? मग 'या' 5 रेसिपी उपवासासाठी ट्राय तर करा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
साबुदाण्यापासून केवळ खिचडी आणि वडेच नाही तर अजूनही अनेक स्वादिष्ट आणि वेगळ्या रेसिपी बनवता येतात. उपवासात ऊर्जा देणारा आणि सहज पचणारा हा घटक नवरात्रीच्या आहारात वैविध्य आणण्यासाठी उत्तम ठरतो. म्हणूनच अशा लोकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत साबुदाण्याचे काही वेगळे पदार्थ आणि ते कसे बनवायचे याची माहिती घेऊ.
advertisement
1/8

नवरात्रीला लोक उपवास करतात. अशा वेळी अनेक जण वेगवेगळे उपवासाचे आहार निवडतात. त्यात साबुदाणा हे सर्वाधिक खाल्ले जाणारे अन्न आहे. बहुतांश वेळा लोकांना साबुदाण्यापासून केवळ खिचडी किंवा वडेच बनवता येतात असं वाटतं. पण रोज तेच तेच पदार्थ खाल्ल्याने अनेकांना कंटाळाही येतो.
advertisement
2/8
मात्र, साबुदाण्यापासून केवळ खिचडी आणि वडेच नाही तर अजूनही अनेक स्वादिष्ट आणि वेगळ्या रेसिपी बनवता येतात. उपवासात ऊर्जा देणारा आणि सहज पचणारा हा घटक नवरात्रीच्या आहारात वैविध्य आणण्यासाठी उत्तम ठरतो. म्हणूनच अशा लोकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत साबुदाण्याचे काही वेगळे पदार्थ आणि ते कसे बनवायचे याची माहिती घेऊ.
advertisement
3/8
1. साबुदाणा थालिपीठभिजवलेल्या साबुदाण्याबरोबर उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचे कूट, मिरची, मीठ आणि थोडं जिरे मिसळून गोळा बनवा. त्याचे थालिपीठ करून तव्यावर तूप किंवा तेल लावून खरपूस भाजा. हे पौष्टिक आणि पोटभरीचं थालिपीठ उपवासात छान लागते.
advertisement
4/8
2. साबुदाणा खीरसाबुदाण्याला दूधात शिजवून त्यात साखर, वेलचीपूड आणि काजू-बदाम घालून बनवलेली खीर उपवासासाठी गोड पर्याय आहे. ही खीर हलकी, लवकर पचणारी आणि चवीला अप्रतिम असते.
advertisement
5/8
3. साबुदाणा लाडूभिजवलेला साबुदाणा कोरडा करून भाजून घ्या. त्याचे पीठ तयार करून गुळ, सुकामेवा आणि थोडंसं तूप मिसळा. लहान लाडू वळून घ्या. उपवासात ऊर्जा देणारा हा गोड पदार्थ खास नवरात्रीसाठी योग्य आहे.
advertisement
6/8
4. साबुदाणा कटलेटसाबुदाणा, उकडलेला बटाटा, मिरची, मीठ आणि शेंगदाणे मिसळून चपटे कटलेट बनवा आणि शॅलो फ्राय करा. हा स्नॅक खुसखुशीत आणि पोटभरण्यासाठी मदत करतो.
advertisement
7/8
5. साबुदाणा दहीवडाभिजवलेला साबुदाणा आणि उकडलेला बटाटा वापरून वडे तयार करा. हे वडे दह्यात टाकून त्यावर मिरची-जीरं पावडर, साखर आणि मीठ घालून चविष्ट दहीवडे बनवा. उपवासात चविष्ट आणि ताजेतवाने लागणारा हा पर्याय नक्की आवडेल.
advertisement
8/8
नवरात्रीत साबुदाण्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज करून रोजच्या उपवासात वैविध्य आणता येऊ शकतं. त्यामुळे खिचडी किंवा वड्यांपुरता मर्यादित न राहता या नव्या पदार्थांचा नक्की आस्वाद घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Navratri Special : साबूदाणा वडा आणि खिचडी खाऊन कंटाळा आलाय? मग 'या' 5 रेसिपी उपवासासाठी ट्राय तर करा