TRENDING:

Turmeric Milk Side Effects : रोज हळदीचं दूध पिता? तुमची 'ही' एक चूक सर्व फायद्यांवर पडू शकते भारी, वाढवेल शरीराचे त्रास!

Last Updated:
Turmeric Milk Side Effects : हळदीचे दूध आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे बरेच लोक ते रोज पितात. त्याचा आपल्या शरीराला निश्चितच फायदा होतो. शरीराचे छोटे छोटे त्रासही नाहीसे होतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुमची एक चूक त्या हळदीच्या दुधाच्या सर्व फायद्यांवर भारी पडते आणि यामुळे तुम्हाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
1/9
रोज हळदीचं दूध पिता? तुमची 'ही' एक चूक सर्व फायद्यांवर पडू शकते भारी, वाढवेल शरी
हळदीचे दूध पिणे फायद्याचे असते. मात्र एक चूक या फायद्यांवर पूर्णपणे पाणी टाकू शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत हळदीचे दूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित असायला हवी अन्यथा ते तुमच्या शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम करू शकते. चला पाहूया हळदीचे दूध रात्रीच, पण केव्हा पिणं योग्य.
advertisement
2/9
Indiatoday मध्ये दिलेल्या माहितीनुसार, हळदीचे दूध पिण्याची विशशिष्ट वेळ असते आणि ती वेळ चुकल्यास त्रास होऊ शकतो. अनेक जण हळदीचे दूध झोपण्यापूर्वी पितात. मात्र आरोग्य तज्ञ सांगतात, शेवटचे जेवण आणि झोपण्याच्या दरम्यान किमान एक ते दोन तासांचे अंतर असावे.
advertisement
3/9
एक ग्लास हळदीचे दूध कॅलरीजने भरलेले असते आणि ते पचनसंस्थेवर परिणाम करू शकते. ते पिल्यानंतर लगेच झोपल्याने आरोग्यावर अनेक परिणाम होऊ शकतात.
advertisement
4/9
नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाच्या प्रमुख आहारतज्ञ चारू सदाना यांनी सांगितले, 'हळदीमधील कर्क्यूमिन पचन आणि आराम करण्यास मदत करते. मात्र ते झोपण्याच्या जस्ट आधी आणि मोठ्या जेवणानंतर प्यायल्यास, त्याने त्रास होऊ शकतो. कर्क्यूमिन पित्त उत्पादनास उत्तेजन देते, ज्यामुळे काही लोकांना झोपताना अस्वस्थता किंवा ऍसिड रिफ्लक्स निर्माण होण्याची शक्यता असते.'
advertisement
5/9
'दूध हे जड अन्न आहे. म्हणून ते पचवण्यासाठी पुरेशी पचनक्रिया आवश्यक असते. मात्र रात्री नैसर्गिकरित्या पचन मंदावते. अशावेळी झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास त्यामुळे पोटात सूज येणे, आम्लता किंवा ऍसिड रिफ्लक्स निर्माण करू शकते.' असे नवी दिल्ली येथील PSRI हॉस्पिटलमधील GI सर्जरी आणि यकृत प्रत्यारोपण आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. भूषण भोळे यांनी सांगितले.
advertisement
6/9
हळदीच्या दुधामुले शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. 'जेवणानंतर लगेच हळदीचे दूध प्यायल्याने अनावश्यक कॅलरीज वाढू शकतात आणि पचनावर परिणाम होऊ शकतो,' अशी माहिती दिल्लीतील ब्लूम क्लिनिक्सच्या पोषणतज्ञ डॉ. अंजना कालिया यांनी दिली.
advertisement
7/9
हळदीचे दूध पिण्याची योग्य पद्धत आणि वेळ : रात्रीच्या जेवणानंतर लगेच दूध प्यायल्याने कॅलरीज तर वाढतातच, शिवाय तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने पोटात सूजही येऊ शकते. म्हणून कॅलरीजची चिंता असेल तर रात्रीच्या जेवणापूर्वी दूध पिणे चांगले. यामुळे तुम्ही जेवणही कमी कराल. कारण दुधाने तुमचे पोट आधीच भरलेले असेल.' असे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुदीप खन्ना यांनी सांगितले.
advertisement
8/9
त्याचप्रमाणे दुधात साखर घालणेही चुकीचे आहे. रात्रीच्या जेवणानंतर किमान एक ते दोन तासांनी घेतलेला एक छोटा कप कोमट, कमी चरबीयुक्त हळदीचे दूध पिणे फायद्याचे ठरू शकते. फक्त एक चिमूटभर हळद वापरा आणि साखर टाळा. यामुळे पचनावर ताणयेणार नाही, पोषण मिळेल आणि झोपही चांगली लागेल.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Turmeric Milk Side Effects : रोज हळदीचं दूध पिता? तुमची 'ही' एक चूक सर्व फायद्यांवर पडू शकते भारी, वाढवेल शरीराचे त्रास!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल