TRENDING:

Visa Free Countries : तुमची फॉरेन ट्रॅव्हलबकेट लिस्ट करा अपडेट, 2026 मध्ये 'या' 26 देशांत करू शकता व्हिसा फ्री प्रवास!

Last Updated:
फॉरेन ट्रॅव्हल म्हणलं की, आधी आपल्या डोळ्यासमोर येतात व्हिसाची किचकट प्रक्रिया आणि त्यासाठी लागणार विलंब. यामुळे बऱ्याच लोकांचा फिरायला जाण्याचा मूड कालांतराने जातो. म्हणूनच आपण भारतीयांसाठी व्हिसा काही फ्री असलेल्या देशांचा विचार करू शकतो. आज आम्ही तुम्हाला 2026 मध्ये फिरण्यासारख्या 26 देशांची माहिती देत आहोत, जे भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहेत.
advertisement
1/5
तुमची फॉरेन ट्रॅव्हल लिस्ट करा अपडेट, 'या' 26 देशांत करू शकता व्हिसा फ्री प्रवास
समुद्रकिनारा असलेले ठिकाण : तुम्हाला समुद्र किनारी फिरायला आवडत असेल आणि व्हिसा-मुक्त प्रवास करायचा असेल तर तुम्ही बार्बाडोस, जमैका, ग्रेनाडा, हैती, सेंट व्हिन्सेंट, ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांना भेट देऊ शकता.
advertisement
2/5
समुद्रकिनारा असलेले ठिकाण : कुक बेटे, फिजी, वानुआटु, किरिबाती, मायक्रोनेशिया आणि मॉरिशस हीदेखील भारतीय प्रवाश्यांसाठी उत्तम ठिकाणेआहेत.
advertisement
3/5
भारताजवळचे व्हिसा फ्री देश : भारताजवळचे भूतान आणि नेपाळ व्हिसा-मुक्त आहेत. हे बऱ्याच लोकांना माहीतही आहे. याशिवाय तुम्ही थायलंड आणि मलेशियासारख्या गजबजलेल्या ठिकाणांनाही भेट देऊ शकता. यासोबतच फिलिपिन्सदेखील तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
advertisement
4/5
भारतीयांसाठी आफ्रिकेचा पर्याय : अनेक आफ्रिकन देश आता भारतीयांना व्हिसा-मुक्त प्रवेश देतात. रवांडा, सेनेगल अंगोला आणि गांबिया यांसारख्या ठिकाणी तुम्ही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.
advertisement
5/5
इत्तर काही आकर्षक स्थळं : डोमिनिका, मोंटसेराट कझाकस्तान, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, मकाओ ही ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत. तुम्ही काहीश्या वेगळ्या अनुभवासाठी या ठिकाणां भेट देऊ शकता. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Visa Free Countries : तुमची फॉरेन ट्रॅव्हलबकेट लिस्ट करा अपडेट, 2026 मध्ये 'या' 26 देशांत करू शकता व्हिसा फ्री प्रवास!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल