Walking Benefits : वयानुसार व्यक्तीने किती चालावं? 'हा' चार्ट पाहा, वजन कमी करणं होईल सोपं
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
पूर्वी किती का होईना चालणं गरजेचं असं लोक म्हणायचे. मात्र आता लोक आपल्या आरोग्याविषयी खूप जागरूक झाले आहेत. त्यामुळे आपण किती पावलं चालावं, जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील. हे जाणून घेण्याकडे लोकांचा कल असतो. साधारणपणे दररोज किमान 10,000 पावले चालावे, असे अभ्यासात सांगितले गेले आहे. मात्र वयानुसार आपण किती चालावं हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया.
advertisement
1/12

आजकाल जीवनशैलीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. याचा सर्वाधिक धक्का तरुणांना बसतो आहे. कोव्हीडच्या काळात एकाच ठिकाणी तासंतास बसणे, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर सतत काम करणे, व्यायाम न करणे, घरात बसणे ही जीवनशैली बनली आहे. यामुळे लठ्ठपणा, रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होणे, खराब कोलेस्ट्रॉल अशा अनेक समस्या होत आहेत.
advertisement
2/12
मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते हे सर्व आजार होण्याआधीच ते टाळता येऊ शकतात. त्यांच्यासाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे नियमित चालणे. डॉक्टर म्हणतात, जर तुम्ही दररोज हजारो पावले नियमितपणे चालत असाल तर तुम्हाला निरोगी राहण्यासाठी कोणताही व्यायाम करण्याची गरज नाही. अशाप्रकारे मधुमेहासारख्या असाध्य आजारापासून तुम्ही मुक्त होऊ शकता.
advertisement
3/12
अमेरिकन काउन्सिल ऑन एक्सरसाइजनुसार, तुम्ही दिवसातून 2,500 पावले चालून निरोगी राहू शकता. मात्र इतर अनेक अभ्यास रोज किमान 10,000 पावले चालण्याची शिफारस करतात. पण प्रश्न असा आहे की, प्रत्येकाने 10,000 फूट चालावे की वयोमानानुसार लहान मुले, मध्यमवयीन आणि वृद्ध यांनी किती चालावं?
advertisement
4/12
यासंदर्भात दिल्लीतील सुप्रसिद्ध एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. संजय कालरा म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने किमान 10,000 पावले चालली पाहिजेत. त्यामुळे हृदय निरोगी राहते.
advertisement
5/12
हे जीवनशैलीशी संबंधित आजार जसे की, मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात, लठ्ठपणा, नैराश्य, स्तन-कोलन कर्करोग इत्यादींपासून संरक्षण करते. काही अभ्यासांनी असे सूचित केले आहे की, दररोज 4 ते 5,000 पावले चालणे आरोग्यदायी आहे. परंतु 10,000 पावले चालणे आरोग्यास धोका नाही.
advertisement
6/12
मुलांबद्दल डॉक्टरांनी सांगितले की, मुलांनी नियमितपणे खेळावे आणि उड्या माराव्या. मुलांनी दररोज किमान एक ते दीड तास व्यत्यय न आणता खेळावे आणि उडी मारावी. यामुळे ते निरोगी राहतील आणि सर्व क्षेत्रात पुढे जातील.
advertisement
7/12
सरासरी उंचीचा प्रौढ व्यक्ती दररोज 10,000 पावलं चालत असल्यास 10,000 पावलं किती किलोमीटर आहे? हे अंतर अंदाजे 7.5 किलोमीटर आहे. हे अंतर चालण्यासाठी सुमारे अडीच तास लागू शकतात.
advertisement
8/12
10,000 पावलं अंतर वयानुसार बदलू शकते. ते कव्हर करण्याची वेळ देखील बदलू शकते. एका अभ्यासानुसार, याची संख्या वयानुसार बदलते. 40 वर्षांच्या महिलांनी रोज 12,000 पावले चालावं. 40 ते 50 वर्षांच्या महिला 11,000 पावले तर 50 ते 60 वर्षांच्या महिलांनी 10,000 पावलं चालावी.
advertisement
9/12
60 वर्षांवरील महिला 8 हजार पावलं चालू शकतात. 18 ते 50 वर्षे वयोगटातील पुरुष रोज 12 हजार पावले तर 50 वर्षांवरील पुरुष रोज 11 हजार पावलं चालू शकतात.
advertisement
10/12
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सामान्य आरोग्याच्या दृष्टीने वरील तक्त्यामध्ये वयानुसार किती पावले चालायची हे ठरवले आहे. परंतु, जर एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असेल तर त्याने चालणे वाढवावे.
advertisement
11/12
याशिवाय लठ्ठ व्यक्तींनी शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जमा झालेल्या चरबीनुसार काही व्यायामही करायला हवेत. एखाद्याला मधुमेह किंवा जास्त साखरेचा त्रास असेल तर अशावेळी डॉक्टर त्याला दररोज १२ हजार पावले चालण्याचा सल्ला देतात.
advertisement
12/12
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणतीही कृती करण्यापूर्वी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Walking Benefits : वयानुसार व्यक्तीने किती चालावं? 'हा' चार्ट पाहा, वजन कमी करणं होईल सोपं