TRENDING:

Weight Loss Tips : एका महिन्यात 10 किलो वजन कमी करण्यासाठी रोज किती चालावं? हे नियम पाळा

Last Updated:
वजन कमी करणं बऱ्याचदा खूप आव्हानात्मक काम होऊन जातं. लोक खूप प्रयत्न करतात पण त्यांचे वजन कमी होत नाही. तर काही लोक थोड्या मेहनतीने वजन कमी करतात. चालल्याने वजन कमी होऊ शकते. मात्र त्यासाठी रोज किती किलोमीटर चालावे हे खूप महत्त्वाचे असते. चला जाणून घेऊया 10 किलो वजन कमी करायचे असेल रोज किती चालावे..
advertisement
1/7
एका महिन्यात 10 किलो वजन कमी करण्यासाठी रोज किती चालावं? हे नियम पाळा
100 कॅलरीज जाळण्यासाठी 2 किलोमीटर चालणे आवश्यक आहे. खरं तर वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर चालले पाहिजे याचे कोणतेही परफेक्ट उत्तर नाही. वेगवेगळ्या लोकांचे अनुभव वेगळे असू शकतात. कारण याला अनेक घटक कारणीभूत असतात.
advertisement
2/7
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, 1 मैल किंवा 1.6 किलोमीटर चालल्याने 55 ते 140 कॅलरीज बर्न होतात. तुमचा चालण्याचा वेग किती आहे, यावर ते अवलंबून आहे. ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिस रोज किमान 150 मिनिटे मध्यम चालण्याचा सल्ला देते. तुम्ही जलद चालत असाल तर 75 मिनिटे चलावे.
advertisement
3/7
आजकाल दररोज 10 हजार पावले चालण्याचा सल्ला दिला जातो. पण चालण्याने किती किलो वजन कमी करता येईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. उत्तर असे आहे की प्रत्येक व्यक्तीचे वजन वेगवेगळ्या प्रकारे कमी होते.
advertisement
4/7
काही लोकांचे वजन एका महिन्यात 10 किलो कमी होते, तर काही लोकांना 10 किलो वजन कमी करण्यासाठी 2 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. वजन किती कमी होईल यासाठी अनेक घटक जबाबदार असतात.
advertisement
5/7
डॉ. श्रीहरी अनिखिंडी म्हणतात की, तुमचे वजन किती कमी होईल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. साधारणपणे, वजन कमी करण्यासाठी वेगवान व्यायामाची शिफारस केली जाते. वेगवान व्यायाम म्हणजे जेव्हा तुम्ही चालता तेव्हा त्याचा वेग कमीत कमी 6 किलोमीटर प्रति तास असावा.
advertisement
6/7
एखादी व्यक्ती यापेक्षा जास्त वेगाने चालत असेल किंवा धावत असेल तर त्याचे वजन वेगाने कमी होईल. मात्र, केवळ चालण्याने वजन कमी होणार नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारावरही नियंत्रण ठेवावे लागेल.
advertisement
7/7
पौष्टिक नसलेल्या सर्व गोष्टी आहारातून वगळून आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करावा लागेल. त्याचबरोबर आहाराचे प्रमाणही कमी करावे लागेल. याशिवाय वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनही महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Weight Loss Tips : एका महिन्यात 10 किलो वजन कमी करण्यासाठी रोज किती चालावं? हे नियम पाळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल