TRENDING:

Unique Recipe : शिळ्या चपात्यांची अशी डिश तुम्ही खाल्ली नसेल, बनवता येतात टेस्टी गुलाबजाम! पाहा सोपी रेसिपी

Last Updated:
शिळ्या चपात्यांचा आपण अनेकदा चुरमा बनवून खातो. पण तुम्हाला माहितीये तुम्ही शिळ्या चपात्यांपासून गुलाबजामही बनवू शकता. हे गुलाबजाम बनवायला सोपे आहेत आणि तुम्हाला नक्कीच आवडतील.
advertisement
1/7
शिळ्या चपात्यांची अशी डिश तुम्ही खाल्ली नसेल, बनवता येतात टेस्टी गुलाबजाम! पाहा सोपी रेसिपी
गुलाबजाम म्हणलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतंच. पण गुलाबजाम बनवण्याची पारंपरिक पद्धत जरा महागडी आणि वेळखाऊ आहे. म्हणूनच हे शिळ्या चपात्यांचे गुलाबजाम आपण एकदा ट्राय करूच शकतो. म्हणजे चपाती वयही जाणार नाही आणि आपल्याला गोडही खायला मिळेल. या गुलाबजामची रेसिपी niluskitchen1986 या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिली गेली आहे.
advertisement
2/7
शिळ्या चपात्यांचे गुलाबजाम बनवण्यासाठी तुम्हाला शिळ्या चपात्या, तूप किंवा तेल, 1/2 कप दूध, 2 चमचे रवा, 1 चिमूटभर बेकिंग सोडा, 1/2 चमचा वेलची पूड, 1 कप साखर, 1 कप पाणी, 1 चमचा गुलाबजल, केशर एवढे साहित्य लागेल.
advertisement
3/7
शिळ्या चपात्यांचे गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वात आदी चपात्यांचे तुकडे करा आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पावडर तयार करा. आता यामध्ये दूध हे मिक्सरला पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या. जेणेकरून याचा पिठासारखा गोळा तयार होईल.
advertisement
4/7
तयार चपात्यांच्या मिश्रणामध्ये बेकिंग सोडा, वेलची पूड आणि मिल्क पावडर त्याची मऊसूत कणिक मळून घ्या. गरज वाटल्यास आणखी थोडं दूध घाला. हही कणिक जास्त घट्ट किंवा खूप सैल होणार नाही याची काळजी घ्या.
advertisement
5/7
दुसरीकडे एका पातेल्यात साखर आणि पाणी घालून साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे. आता यामध्ये वेलची, गुलाबजल आणि केशर घालून गुलाबजामला हवा असतो, तास पाक होईपर्यंत शिजवा.
advertisement
6/7
भिजवलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. एका कढईमधे तेल किंवा तूप गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये हे हे गोळे टाकून त्याला सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत तळा.
advertisement
7/7
हे तळलेले गुलाबजाम थोड्या गरम पाकात टाका आणि किमान 3 ते 4 तास त्यात भिजू द्या. व्यवस्थित मुरल्यानंतर आणि थंड झाल्यावर तुम्ही खे गुलाबजाम सर्वांना सर्व्ह करू शकता. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Unique Recipe : शिळ्या चपात्यांची अशी डिश तुम्ही खाल्ली नसेल, बनवता येतात टेस्टी गुलाबजाम! पाहा सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल