अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा?
दहावी नापास असलेला अशोक खरात अभ्यासात हुशार नसला तरी त्याला मानसशास्त्राचा चांगला अभ्यास होता. तो महिलांच्या अडीअडचणी जाणून घेत. त्यांच्याशी गोड बोलून, त्यांच्या भावनांना हात घालायचा. भावनिक पातळीवर जवळीक साधून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. तू दिसायला खूप सुंदर आहेस. तुझा पती तुला समजून घेण्यात कमी पडतो. तुझी खरी क्षमता त्याला ओळखता येत नाही, असं गोडगोड बोलून अशोक खरात महिलांना कम्फर्ट द्यायचा. त्यांना मानसशास्त्रीय सापळ्यात अडकवायचा.
advertisement
अशा गरजू आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या, अडचणीत सापडलेल्या किंवा वैयक्तिक आयुष्यात गोंधळात असलेल्या महिलांना तो टार्गेट करायचा. त्यांच्या अडचणी दूर करायच्या नावाखाली तो महिलांना गुंगीचं औषध द्यायचा. ऊर्जा हस्तांतरणाच्या नावाखाली तो महिलांचं लैंगिक शोषण करायचा. महिलांनी आरोपी अशोक खरातला विरोध केला तर तो त्यांना प्रकोप करण्याची भीती दाखवायचा. दैवी शक्तीने कुटुंब, संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी द्यायचा. आरोपीच्या या मोडस ऑपरेंडीमुळे अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेली महिला बाहेर पडू शकत नव्हती. तिच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन अशोक खरात त्यांच्यावर अत्याचार करत असे, असं तापासात समोर आलं आहे.
अशोक खरातची आज कोठडी संपणार
आज खरातची पोलीस कोठडी संपत असून, त्याला पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी पक्षाकडून केली जाण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान आतापर्यंत काय माहिती समोर आली, याचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला जाऊ शकतो. त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
