वाहतुकीत झालेले बदल आणि पर्यायी मार्ग:
यात्रेच्या काळात खालील मार्गांवर प्रवेश बंद असेल आणि प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
१. बोपोडी (संविधान चौक) ते दापोडी गावठाण:
बदल: संविधान चौकाकडून दापोडी गावठाणाकडे येणारी वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग: या मार्गावरील वाहने हॅरिस पूलमार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतात.
२. शीतळादेवी चौक (दापोडी) कडे जाणारा मार्ग:
advertisement
बदल: दापोडीतील मुख्य शीतळादेवी चौकात येणारे रस्ते बंद राहतील.
पर्यायी मार्ग: वाहनचालकांनी पिंपळे गुरव किंवा फुगेवाडीमार्गे प्रवास करावा.
३. सांगवी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक:
बदल: सांगवीकडून दापोडीतील आंबेडकर चौकाकडे येणारी वाहने रोखली जातील.
पर्यायी मार्ग: या मार्गावरील वाहनांनी शीतळादेवी चौकातून डावीकडे वळून फुगेवाडीमार्गे पुढे जावे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्सवात अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी या बदलांची अंमलबजावणी केली आहे. या दोन दिवसात दापोडी परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी केले आहे.
