Interesting Facts : बाथरूम-वॉशरूम समजलं, पण 'WC' चा नेमका अर्थ काय आहे? हे चिन्ह कुठे आणि का वापरतात?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
What does the WC means : 'टॉयलेट' या शब्दाला पर्यायी शब्द अनेक आहेत. पण ते सर्व कुठे वापरावे याचेही वेगवेगळे नियम असतात. टॉयलेटसाठी वॉशरूम, पावडर रूम, रेस्टरूम असे अनेक शब्द वापरले जातात. मात्र ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात. परंतु WC हा नेमका अर्थ काय होतो. हा शब्द कुठे वापरला जातो. चला पाहूया.
advertisement
1/5

टॉयलेटला अनेक प्रकारे संबोधले जाते. जसं घर, हॉटेल्स आणि अपार्टमेंट अशा ठिकाणी असलेल्या टॉयलेटला बाथरूम म्हणतात. कारण तिथे सिंक, शॉवर आणि बाथटबदेखील असतो.
advertisement
2/5
बऱ्याच ठिकाणी टॉयलेटला वॉशरूमदेखील म्हंटले जाते. सामान्यपणे सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या टॉयलेटला वॉशरूम म्हणतात. जसं थिएटर, रेल्वे स्टेशन, विमानतळ, दुकाने, मॉल किंवा पार्कमध्ये असणारे टॉयलेट त्यांना लोक वॉशरूम म्हणतात.
advertisement
3/5
WC हे देखील टॉयलेटच्या दरवाजा किंवा भिंतीवर लिहिले जाते. याचा फुल फॉर्म 'वॉटर क्लोसेट' असा आहे. हा शब्द 19व्या शतकात लोकप्रिय झाला होता. त्यावेळी आधुनिक प्लंबिंग सिस्टम विकसित होत होती आणि 'वॉटर क्लोसेट' हा शब्द म्हणजे एक अशी खाजगी, बंद जागा, जी फ्लशिंग सिस्टम आणि पाणीपुरवठा देखील करते. हा त्या काळातील सर्वात आधुनिक शोध होता. म्हणून हळूहळू हा शब्द 'WC' असा वापरला जाऊ लागला.
advertisement
4/5
टॉयलेटच्या दारांवर WC लिहिलेल्या पाट्या यूके आणि युरोपसारख्या देशांमध्ये सामान्यपाने दिसतात. नंतर ते जगभर पसरले. मात्र WC हा शब्द अजूनही संपूर्ण जगात प्रचलित नाही. त्यामुळे याचा अर्थ बऱ्याच लोकांना लवकर कळत नाही.
advertisement
5/5
इतर ठिकाणांपेक्षा संपूर्ण युरोपमध्ये, हॉटेल्स, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांमध्ये WC चे लिहिलेल्या पाट्या टॉयलेटबाहेर दिसतात. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Interesting Facts : बाथरूम-वॉशरूम समजलं, पण 'WC' चा नेमका अर्थ काय आहे? हे चिन्ह कुठे आणि का वापरतात?