नखांवरून कळते शरिराची अवस्था, तुमच्या नखांचा रंग कोणता? पांढरा असेल तर...
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
'माझी नखं स्वच्छ, सुंदर आहेत', हे तुम्ही अनेकजणांकडून ऐकलं असेल. मात्र तुम्हाला माहितीये का, संपूर्ण शरिरातल्या व्याधी नखांच्या फक्त रंगावरून कळतात. त्यामुळे भविष्यात एखाद्या गंभीर आजाराचं निदान होण्यापेक्षा आजच आपल्या नखांचा रंग तपासणं कधीही उत्तम.
advertisement
1/6

नखांचं एवढं काय काम आहे, असं आपल्याला वाटू शकतं. मात्र लहान असली तरी नखं हा शरिराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. अनेकजण आपल्या नखांची काळजी घेतात. महिला नखांना पेंटदेखील करतात. मात्र नखांवरून आजार ओळखता येतात हे आपल्याला कदाचित माहित नसेल. आज आपण त्याबाबतच जाणून घेऊया.
advertisement
2/6
आयुर्वेदिक डॉक्टर वी के पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरिरात कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता आहे हे नखांवरून कळतं. शिवाय हिमोग्लोबीनची पातळीही नखांच्या रंगावरून ओळखता येते. त्यासाठी आपल्याला केवळ नखांचा रंग नेमका कोणता आहे हे व्यवस्थित पाहावं लागतं.
advertisement
3/6
डॉक्टरांनी सांगितलं की, नखं पिवळी असतील तर तुमच्या शरिरात B12 आणि B16 जीवनसत्त्वांची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे काळजी घ्यायला हवी. तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ शकता, जसं की, मोड आलेली कडधान्य, पालेभाज्या, दूध, चीज, सोयाबीन, इत्यादी, ज्यातून तुम्हाला जीवनसत्त्व मिळतील.
advertisement
4/6
जर तुमची नखं काळी पडली असतील तर तुम्हाला किडनीसंबंधित आजार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळूहळू तुमची नखं पूर्ण काळी होतील. कदाचित हा मूतखडे म्हणजेच किडनीस्टोनचा किंवा किडनी फेल झाल्याचा इशाराही असू शकतो. तर, याउलट जर तुमची नखं पांढरी पडली असतील तर शरिरात हिमोग्लोबीनची कमतरता असू शकते. ही कमी भरून काढण्यासाठी तुम्ही बीट, पालेभाज्या, पपई, किवी खाऊ शकता. दूध, डाळिंब आणि इतर फळांचा रसही पिऊ शकता.
advertisement
5/6
नखांमध्ये भेगा असतील किंवा नखं कुरतडल्यासारखी असतील तर तुमची अन्नपचन शक्ती कमकुवत असल्याचा हा संकेत आहेत. त्यामुळे तुम्ही संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. तुमच्या जेवणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, गूड फॅट्स, न्यूट्रिएंट्स, व्हिटॅमिन्स आणि ग्लुकोज समप्रमाणात असणं महत्त्वाचं आहे.
advertisement
6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
नखांवरून कळते शरिराची अवस्था, तुमच्या नखांचा रंग कोणता? पांढरा असेल तर...