गोव्यात महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ५०० जणांची हिंदू धर्मात ‘घरवापसी’
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
आखाडा परिषदेतील प्रमुख साधुसंत आणि महंतांच्या साक्षीने वेदपठण, हवन आणि पारंपरिक हिंदू विधी पार पडले.
advertisement
1/5

पणजी (गोवा) : महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर गोव्यातील पणजी येथील ३० वाडी परिसरात देव गोवेश्वर महाशिव मंदिरात भव्य धार्मिक सोहळा पार पडला. या सोहळ्यात सुमारे ५०० बांधवांनी हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केल्याची माहिती आयोजकांनी दिली.
advertisement
2/5
या कार्यक्रमास जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न झाले. आखाडा परिषदेतील प्रमुख साधुसंत आणि महंतांच्या साक्षीने वेदपठण, हवन आणि पारंपरिक हिंदू विधी पार पडले.
advertisement
3/5
देव गोवेश्वर महाशिव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
advertisement
4/5
आयोजकांच्या माहितीनुसार, सुमारे ३०० बांधवांनी औपचारिकरीत्या ‘घरवापसी’ केली, तर इतर २०० जणांनीही हिंदू धर्म स्वीकारत एकूण संख्या ५०० वर पोहोचली. देशभरातील विविध आखाड्यांतील संत-महंत या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
advertisement
5/5
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे गोवा राज्यात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून या सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे..
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
गोव्यात महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ५०० जणांची हिंदू धर्मात ‘घरवापसी’