TRENDING:

PAK vs IND : कोलंबोत भारत जिंकल्यावर थेट सुपर 8 मध्ये पोहोचणार, पाकिस्तान आजच होणार T20 वर्ल्ड कपमधून बाहेर? पाहा समीकरण!

Last Updated:
PAK vs IND T20 World Cup Super 8 qualification scenario : आजच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मॅचमध्ये टीम इंडिया पाकिस्तानला हरवेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पाकिस्तान बाहेर पडणार का? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
1/5
PAK vs IND : पाकिस्तान आजच होणार T20 वर्ल्ड कपमधून बाहेर? पाहा समीकरण!
आजच्या सामन्यानंतर भारतीय संघ सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की करणार की पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होणार, याबाबत अनेक समीकरणं बांधली जात आहे. पण खरंच पाकिस्तान बाहेर पडणार का? जाणून घ्या
advertisement
2/5
भारतीय टीमकडे सध्या दोन मॅचेस शिल्लक असून टीम इंडियाकडे 4 पॉइंट्स आहेत आणि नेट रन रेट सुद्धा +3.050 असा शानदार आहे. पाकिस्तानची अवस्था सुद्धा भारतासारखीच असून त्यांच्याकडेही दोन मॅचेस आणि 4 पॉइंट्स आहेत.
advertisement
3/5
पाकिस्तानच्या टीमला सध्या जरी कमी लेखलं जात असलं तरी, त्यांच्यासाठी सुपर 8 चा रस्ता अद्याप पूर्णपणे बंद झालेला नाही. पाकिस्तानने सलग दोन विजय मिळवले असले तरी त्यांचे काम अद्याप बाकी आहे.
advertisement
4/5
आजच्या सामन्यात जो संघ ही मॅच जिंकेल, तो थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. पराभूत होणाऱ्या टीमसाठी मात्र पुढची मॅच 'करा किंवा मरा' अशी असेल. त्यामुळे आजचा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे.
advertisement
5/5
जर आज पाकिस्तान भारताकडून हारला, तर पाकिस्तान बाहेर पडणार नाही. नामिबियाविरुद्धची त्यांची आगामी मॅच अत्यंत महत्त्वाची ठरेल. पाकिस्तानला पुढचा टप्पा गाठण्यासाठी एका विजयाची गरज भासणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs IND : कोलंबोत भारत जिंकल्यावर थेट सुपर 8 मध्ये पोहोचणार, पाकिस्तान आजच होणार T20 वर्ल्ड कपमधून बाहेर? पाहा समीकरण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल