TRENDING:

Brown Rice: डायबेटिक रुग्णांसाठी हा राईस ठरतो वरदान, फायदे ऐकाल तर आजच खरेदी कराल

Last Updated:
Brown Rice: भात हा आपल्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा घटक आहे. अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. काही हेल्थ कॉन्शिअल लोकं आपल्या आहारात ब्राउन राईसचा समावेश करतात. ब्राऊन राईस म्हणजे नेमकं काय आणि त्याचे शरीराला काय फायदे होतात, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
advertisement
1/5
डायबेटिक रुग्णांसाठी हा राईस ठरतो वरदान, फायदे ऐकाल तर आजच खरेदी कराल
ब्राऊन राईस म्हणजेच तपकिरी रंगाचा तांदूळ हा पांढऱ्या तांदळाला एक आरोग्यदायी पर्याय आहे. यात फायबर, व्हिटॅमिन बी (B1, B3, B6, B9), मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक भरपूर असतात.
advertisement
2/5
हा तांदूळ वजन नियंत्रणात राहण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि हृदयासाठी फायदेशीर आहे. विशेषत: टाईप 2 डायबेटीस नियंत्रित करण्यात हा तांदूळ मोठ्या प्रमाणात मदत करतो.
advertisement
3/5
ब्राऊन राईसमधील फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त आहेत. हे घटक कोलेस्टेरॉल नियंत्रित करतात आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
advertisement
4/5
ब्राऊन राईसमुळे कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत होते. त्यामुळे तो आरोग्यवर्धक आहे. शिवाय, या तांदळामुळे अल्झायमर आणि निद्रानाश यांसारख्या आजारांपासून देखील बचाव होते, असं काही अभ्यासांमध्ये समोर आलं आहे.
advertisement
5/5
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांनी ब्राऊन राईसचं सेवन कमी प्रमाणात करावं. कारण, त्यात आर्सेनिक आणि फायटिक अॅसिडचं प्रमाण जास्त असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Brown Rice: डायबेटिक रुग्णांसाठी हा राईस ठरतो वरदान, फायदे ऐकाल तर आजच खरेदी कराल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल