TRENDING:

Marathwada Weather : उकाडा वाढला, मान्सूनची प्रतिक्षा, पेरणी खोळंबली, मराठवाड्यातला हवामान अंदाज काय?

Last Updated:
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे परत तापमानात मोठी वाढ झालेली आहे. मागील काही दिवसांपासून तापमान हे घटलेले होते.
advertisement
1/7
उकाडा वाढला, मान्सूनची प्रतिक्षा, पेरणी खोळंबली, मराठवाड्यातला हवामान अंदाज काय?
मान्सूनचा जोर कमी झाल्याने पावसाने उघडीप दिली आहे. मराठवाड्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
2/7
मराठवाड्यातील कुठल्याही जिल्ह्याला कोणत्याही प्रकारचा अलर्ट हा देण्यात आलेला नाही. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे परत तापमानात मोठी वाढ झालेली आहे. मागील काही दिवसांपासून तापमान हे घटलेले होते.
advertisement
3/7
छत्रपती संभाजीनगरचे कमाल तापमान पुन्हा 34 अंश सेल्सिअस इतके असेल. तापमान वाढल्यामुळे नागरिकांना उकाडा जाणवणार आहे. संभाजीनगरमध्ये आकाश ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यामध्ये जालना, धाराशिव आणि परभणी येथे देखील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस याठिकाणी पडण्याची शक्यता सांगितलेली आहे. या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या ठिकाणी तापमान 30 अंश सेल्सिअस एवढे आहे.
advertisement
5/7
लातूर, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमान परत वाढ झालेली आहे. या ठिकाणी पुढील 24 तासांसाठी ढगाळ वातावरण राहील. 2 जून रोजी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. जून महिन्यामध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस होईल असा हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे.
advertisement
6/7
लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी 1 जून रोजी पावसाने हजेरी लावली होती. 2 जून रोजी देखील या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 1 रोजी झालेल्या पावसामुळे शहरात काही ठिकाणी विजेचे खांब, झाडे तुटून पडलेली आहेत.
advertisement
7/7
मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी जे उन्हाळी पिके घेतले होते त्याचा फायदा हा पिकांना झालेला आहे. जोपर्यंत चांगला पाऊस होतो तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये, असे कृषी खात्याने सांगितले. वातावरणात सतत बदल होत आहेत त्यामुळे नागरिकांनी आपली योग्य ती खबरदारी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather : उकाडा वाढला, मान्सूनची प्रतिक्षा, पेरणी खोळंबली, मराठवाड्यातला हवामान अंदाज काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल