चहा आणि सुट्टाचा प्लॅन फसणार! एका सिगरेटसाठी मोजावे लागणार 72 रुपये?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
व्यसन आता महागात पडणार! सिगरेटच्या किमतीत चौपटीने वाढ; १८ रुपयांची काडी आता ७२ रुपयांना मिळणार? केंद्राचा मोठा निर्णय
advertisement
1/7

जर तुम्हाला सिगरेट किंवा तंबाखूचं व्यसन असेल, तर आता खिशाला मोठी कात्री लावण्यासाठी तयार राहा. केंद्र सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवरील उत्पादन शुल्कात प्रचंड वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मांडलेल्या या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली असून, यामुळे सिगरेट, सिगार, हुक्का आणि खैनीच्या किमती लवकरच गगनाला भिडणार आहेत.
advertisement
2/7
या नवीन कायद्यानुसार, सिगरेटवरील कर प्रति १,००० स्टिक्स मागे २००-७३५ रुपयांवरून थेट २,७०० ते ११,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. सिगरेटची लांबी आणि प्रकारानुसार हा कर आकारला जाईल. धक्कादायक बाब म्हणजे, सध्या बाजारात १८ रुपयांना मिळणारी सिगरेटची एक काडी लवकरच ७२ रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज अधिकारी व्यक्त करत आहेत.
advertisement
3/7
केवळ सिगरेटच नाही, तर खैनीवरील कर २५ टक्क्यांवरून थेट १०० टक्के करण्यात आला आहे. हुक्का तंबाखूवर ४० टक्के आणि स्मोकिंग मिक्सचरवर तर ६०० पटीने वाढ होऊन तो ३०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.
advertisement
4/7
सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडिया आणि सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहींनी याचं स्वागत केलंय, तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटलं की, "मी स्वतः स्मोकर आहे, पण मला हा निर्णय आवडलाय. कदाचित या महागाईमुळे तरी माझी सिगरेट सुटेल."
advertisement
5/7
दिल्लीच्या एका युजरने उपरोधिक टोला लगावत लिहिलं, "मला सिगरेटची काय गरज? मी तर दिल्लीच्या हवेतच श्वास घेऊन सिगरेटचा फील घेतो, ते पण एकदम फ्री!" तर दुसऱ्या एकाने "आता बिडी पिण्याचे दिवस आले," असं म्हणत वाढत्या महागाईवर मिश्किल टिप्पणी केली आहे.
advertisement
6/7
तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सर आणि इतर आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. किमती वाढल्यामुळे तरुण पिढी या व्यसनापासून दूर राहील, असा सरकारचा कयास आहे. मात्र, या निर्णयामुळे तंबाखूचा काळाबाजार वाढण्याची भीतीही काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
advertisement
7/7
नव्या वर्षात पाऊल ठेवण्यापूर्वीच सिगरेट ओढणाऱ्यांसाठी हा एक मोठा 'शॉक' ठरला आहे. आता खरोखरच लोक व्यसन सोडणार की महागड्या किमतीतही धूर काढणं सुरू ठेवणार, हे येणारा काळच सांगेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
चहा आणि सुट्टाचा प्लॅन फसणार! एका सिगरेटसाठी मोजावे लागणार 72 रुपये?