TRENDING:

हाऊसिंग सोसायटीच्या फंडाचे प्रकार किती असतात? त्याचा वापर कुठे करता येतो? ९९ टक्के लोकांना माहीतच नाही

Last Updated:
Housing Society : शहरांमध्ये वाढत्या हाऊसिंग सोसायट्यांमुळे रहिवाशांकडून जमा होणाऱ्या निधीच्या (फंड) वापराबाबत अनेकदा प्रश्न निर्माण होतात.
advertisement
1/6
हाऊसिंग सोसायटीच्या फंडाचे प्रकार किती असतात? त्याचा वापर कुठे करता येतो? ९९ टक्के लोकांना माहीतच नाही
मुंबई : शहरांमध्ये वाढत्या हाऊसिंग सोसायट्यांमुळे रहिवाशांकडून जमा होणाऱ्या निधीच्या (फंड) वापराबाबत अनेकदा प्रश्न निर्माण होतात. सोसायटीचा पैसा नेमका कुठे वापरला जातो, कोणत्या फंडासाठी किती रक्कम जमा होते आणि त्याचे नियम काय आहेत, हे समजून घेणे प्रत्येक सभासदासाठी महत्त्वाचे आहे.
advertisement
2/6
हाऊसिंग सोसायटीचे फंड किती प्रकारचे? -  सामान्यतः हाऊसिंग सोसायटीमध्ये खालील प्रमुख फंड असतात जसे की, मेंटेनन्स फंड, सिंकिंग फंड, रिपेअर आणि मेंटेनन्स फंड रिझर्व्ह फंड, पेंटिंग फंड, कल्याण (वेल्फेअर) फंड, प्रत्येक फंडाचा उद्देश वेगळा असून त्याचा वापर ठराविक कामांसाठीच केला जातो.
advertisement
3/6
मेंटेनन्स फंड - मेंटेनन्स फंड हा सर्वात महत्त्वाचा फंड आहे. यामधून रोजच्या खर्चासाठी पैसे वापरले जातात. ज्यामध्ये सुरक्षा रक्षकांचा पगार स्वच्छता आणि हाऊसकीपिंग, वीज बिल (कॉमन एरिया) लिफ्ट देखभाल, पाणीपुरवठा खर्च दिला जातो.
advertisement
4/6
सिंकिंग फंड -  सिंकिंग फंड  हा दीर्घकालीन खर्चासाठी राखून ठेवला जातो. त्याचा उपयोग हा इमारतीची मोठी दुरुस्ती, स्ट्रक्चरल बदल, लिफ्ट बदलणे. हा फंड सहसा वापरासाठी सहज काढता येत नाही आणि ठराविक नियमांनुसारच वापरला जातो.
advertisement
5/6
रिपेअर आणि मेंटेनन्स फंड -  या फंडाचा वापर लहान-मोठ्या दुरुस्तींसाठी केला जातो. जसे की, गळती दुरुस्ती, पाइपलाइन काम, इलेक्ट्रिकल दुरुस्ती
advertisement
6/6
पेंटिंग आणि वेल्फेअर फंड -  पेंटिंग फंड इमारतीच्या रंगकामासाठी वापरला जातो, जो साधारणतः ५-७ वर्षांनी केला जातो. वेल्फेअर फंड हा सण-उत्सव, सामाजिक उपक्रम आणि रहिवाशांच्या कार्यक्रमांसाठी वापरला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
हाऊसिंग सोसायटीच्या फंडाचे प्रकार किती असतात? त्याचा वापर कुठे करता येतो? ९९ टक्के लोकांना माहीतच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल