TRENDING:

पर्यटकांनी फुलले कोल्हापूर, एकाच दिवसात लाखो भाविकांनी घेतले अंबामातेचे दर्शन, photos

Last Updated:
कोल्हापूरची अंबामाता हे महाराष्ट्रातील नव्हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे याठिकाणी नेहमी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. यातच काल एकच दिवसात याठिकाणी 1 लाखाच्या वर भाविकांनी दर्शन घेतले. (साईप्रसाद महेंद्रकर/कोल्हापूर, प्रतिनिधी)
advertisement
1/7
पर्यटकांनी फुलले कोल्हापूर, एकाच दिवसात लाखो भाविकांनी घेतले अंबामातेचे दर्शन
कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर हे नेहमीच भक्तांनी गजबजलेले पाहायला मिळत असते. वर्षातील 365 दिवस या ठिकाणी बाहेरून भाविकांनी पर्यटक येत असतात.
advertisement
2/7
सध्या सुट्ट्या सुरू आहे. त्यामुळे या दिवसात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची उच्चांकी गर्दी पाहायला मिळत आहे.
advertisement
3/7
सध्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यातच कोल्हापुरात आलेले पर्यटक प्रथम दर्शन अंबाबाई देवीचे घेत असल्याने मंदिरातही भाविकांची संख्या वाढत आहे.
advertisement
4/7
परवा 18 मे रोजी शनिवारी सकाळी 5 ते सायंकाळी 6 पर्यंत इतक्या वेळेत 87,326 भाविकांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले आहे.
advertisement
5/7
तर दिनांक 19 मे रोजी रविवार असल्यामुळे हाच आकडा लाखाचा पार जाऊन 1,42,845 भाविकांनी सकाळी 5 ते सायंकाळी 6 पर्यंत देवीचे दर्शन घेतले आहे.
advertisement
6/7
मंदिर प्रशासनाने वाढणाऱ्या गरजेचे योग्य नियोजन करून प्रत्येक भाविकांची नीट सोय केली आहे. त्यामुळे गर्दी वाढली तरी प्रत्येकाला व्यवस्थित दर्शन घेता येत आहे.
advertisement
7/7
दरम्यान, अंबाबाई मंदिरा व्यतिरिक्त कोल्हापुरातील रंकाळा, पन्हाळा किल्ला, जोतिबा देवस्थान अशा ठिकाणीही पर्यटकांची वाढती संख्या पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
पर्यटकांनी फुलले कोल्हापूर, एकाच दिवसात लाखो भाविकांनी घेतले अंबामातेचे दर्शन, photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल