'दो भाई...दोनों तबाही', सख्खे भाऊ नॉटआऊट राहून 10 विकेटने जिंकवून गेले, वर्ल्ड कपमधला पहिला उलटफेर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
शनिवारपासून सुरू झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये छोट्या टीमनी बलाढ्य टीमना विजय मिळवताना घाम फोडला, पण एकाही टीमला उलटफेर करता आला नव्हता. नेपाळ, अफगाणिस्तान, नेदरलँड्स या टीम विजयाच्या जवळ आल्या होत्या.
advertisement
1/6

टी-20 वर्ल्ड कपमध्ये अखेर 17व्या मॅचमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. आपला पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या इटलीने नेपाळला धक्का दिला आहे. नेपाळच्या 124 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इटलीने एकही विकेट गमावली नाही.
advertisement
2/6
जस्टीन मोस्का आणि ऍन्थनी मोस्का हे दोघं इटलीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. जस्टीन आणि ऍन्थनी हे दोघं सख्खे भाऊ आहेत. नेपाळविरुद्ध दोघांनी नाबाद अर्धशतकं केली.
advertisement
3/6
मोस्का बंधूंच्या 3 पिढ्या या ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये राहिल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल म्हणून जस्टीन आणि ऍन्थनी यांनी हातात बॅट पकडली, पण ऑस्ट्रेलियामधून संधी मिळत नसल्यामुळे दोघं इटलीला गेले.
advertisement
4/6
इटलीकडून मिळालेल्या या संधीचं मोस्का बंधूंनी सोनं केलं. जस्टीन मोस्काने 44 बॉलमध्ये नाबाद 60 रनची खेळी केली, ज्यात 5 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर ऍन्थनी मोस्काने 32 बॉलमध्ये नाबाद 62 रन केले. ऍन्थनीने त्याच्या इनिंगमध्ये 6 सिक्स आणि 3 फोर मारले.
advertisement
5/6
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात दोन भावांनी कधीच ओपनिंगला बॅटिंग केली नव्हती, पण यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये इटलीकडून मोस्का बंधूंनी लागोपाठ दोन सामन्यात इनिंगची सुरूवात केली. 12.4 ओव्हरमध्येच मोस्का बंधूंनी इटलीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
advertisement
6/6
या सामन्यात इटलीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि नेपाळला 19.3 ओव्हरमध्ये 123 रनवर ऑलआऊट केलं. क्रिशन कालुगामागेने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर बेन मनेटीला 2 विकेट मिळाल्या. अली हसन, जेजे स्मट्स आणि जसप्रीत सिंग यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'दो भाई...दोनों तबाही', सख्खे भाऊ नॉटआऊट राहून 10 विकेटने जिंकवून गेले, वर्ल्ड कपमधला पहिला उलटफेर!