TRENDING:

'...म्हणून शिक्षा भोगावी लागतेय', राजपाल यादवची तिहार जेलमधून सुटका नाहीच! 9 कोटींच्या कर्ज प्रकरणी हायकोर्टाचा फटका

Last Updated:
Rajpal Yadav Controversy: ९ कोटींच्या जुन्या कर्ज प्रकरणात अडकलेल्या राजपाल यांना दिल्ली हायकोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. उलट, कोर्टाने राजपाल यांच्या आजवरच्या वागणुकीवर ताशेरे ओढले आहेत.
advertisement
1/7
राजपाल यादवची तिहार जेलमधून सुटका नाहीच! अभिनेत्याला हायकोर्टाचा फटका
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणीत सध्या घट होण्याऐवजी वाढच होताना दिसत आहे. ९ कोटींच्या जुन्या कर्ज प्रकरणात अडकलेल्या राजपाल यांना गुरुवारी दिल्ली हायकोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. उलट, कोर्टाने राजपाल यांच्या आजवरच्या वागणुकीवर ताशेरे ओढले आहेत.
advertisement
2/7
"तुम्ही तुमच्या शब्दाला जागला नाहीत, दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, म्हणूनच तुम्हाला ही शिक्षा भोगावी लागत आहे," अशा कडक शब्दांत कोर्टाने त्यांची कानउघाडणी केली आहे.
advertisement
3/7
गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीत राजपाल यांच्या वकिलांनी भाचीच्या लग्नाचं कारण देत जामिनाची मागणी केली होती. मात्र, न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी राजपाल यांची ही विनंती मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला.
advertisement
4/7
कोर्टाने म्हटलं की, तुम्ही वर्षानुवर्षे पैशांची परतफेड टाळली, अनेकदा सेटलमेंटची आश्वासनं देऊनही ती मोडली. तुम्ही कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, हे विसरता येणार नाही. राजपाल यादव यांनी २०१० मध्ये 'अता पता लापता' या चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज घेतलं होतं, जे आता व्याजासह ९ कोटींवर पोहोचलं आहे.
advertisement
5/7
राजपाल यादव तिहार जेलमध्ये असले, तरी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी त्यांच्यासाठी कंबर कसली आहे. सोनू सूद याने सर्वात आधी मदतीचा हात पुढे करत राजपाल यांना आपल्या नवीन चित्रपटासाठी साईन केलं आणि भरघोस साइनिंग बोनसही दिला. सोनूने इतर सेलिब्रिटींनाही राजपाल यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
6/7
या आवाहनाला प्रतिसाद देत सलमान खान, अजय देवगण आणि वरुण धवन यांसारख्या बड्या स्टार्सनी राजपाल यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. 'वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' (FWICE) ने सुद्धा आपल्या सर्व सदस्यांना राजपाल यादव यांच्यासाठी फंड गोळा करण्याची विनंती केली आहे.
advertisement
7/7
राजपाल यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं आहे की, ९ कोटींपैकी आता केवळ २ कोटी रुपये देणं बाकी आहे आणि ते सोमवारी दुपारपर्यंत सेटल करण्याची तयारी आहे. "आम्ही सोमवारपर्यंत काहीतरी मार्ग काढू," अशी ग्वाही वकिलांनी दिली आहे. त्यामुळे आता १९ फेब्रुवारीला होणाऱ्या भाचीच्या लग्नात राजपाल उपस्थित राहणार की नाही, याचा निकाल सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'...म्हणून शिक्षा भोगावी लागतेय', राजपाल यादवची तिहार जेलमधून सुटका नाहीच! 9 कोटींच्या कर्ज प्रकरणी हायकोर्टाचा फटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल