4 फेब्रुवारी रोजी दुबईत पार पडलेल्या या प्रतिष्ठित समारंभात जगभरातील तब्बल 3500 संघांनी सहभाग घेतला होता. त्यातून सानिकाच्या स्पून शेअर या प्रकल्पाची निवड होऊन तिला कांस्यपदक, सन्मानचिन्ह आणि 10 हजार अमेरिकन डॉलरचे पारितोषिक मिळाले. ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून मराठवाड्यासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे.
नाश्त्याला कधीपर्यंत तेच तेच पदार्थ खाणार, बनवा पनीर–बेसन चिला, सोप्या रेसिपीचा Video
advertisement
सानिका चव्हाण आणि तिचे सहकारी शुभम पिटेकर, दोघेही देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज येथे शिक्षण घेत आहेत. त्यांनी विकसित केलेले स्पून शेअर हे अॅप अन्न वाया जाण्याच्या समस्येवर तंत्रज्ञानाधारित उपाय सुचवते. हॉटेल, समारंभ किंवा घरांमध्ये उरलेले अन्न अॅपवर नोंदविल्यानंतर ते रिअल-टाइममध्ये जवळच्या गरजू व्यक्ती किंवा संस्थांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे अन्ननासाडी कमी होते आणि गरजूंपर्यंत मदतीचा हात वेळेत पोहोचतो.
दुबईत पार पडलेल्या या परिषदेत 60 हून अधिक राष्ट्रप्रमुख, 500 मंत्री आणि सुमारे 6 हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. अशा भव्य आंतरराष्ट्रीय मंचावर तिसरा क्रमांक मिळवणे ही मोठी जागतिक कामगिरी मानली जात आहे.
स्पून शेअर नेमके काय?
स्पून शेअर हे अन्नवाटप सुलभ करणारे मोबाइल अॅप आहे. अतिरिक्त अन्नाची माहिती देणारे आणि गरजूंपर्यंत ते पोहोचवणारे असे हे तंत्रज्ञानाधारित व्यासपीठ आहे. रिअल-टाइम कनेक्शनमुळे अन्न वेळेत वापरात येते आणि समाजातील अन्ननासाडीच्या समस्येला प्रभावी उत्तर मिळते.





