वय अवघे 5 वर्षे , एकीच्या डोळ्यात तार, दुसरीच्या काडी; डॉक्टरांनी निर्णय घेतला, अंधारात जाणारा जीव वाचला
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
निष्पाप वयातला खेळ एका क्षणात किती धोकादायक ठरू शकतो, याचा अंगावर शहारा आणणारा प्रकार शहरात घडला. वेगवेगळ्या ठिकाणी खेळत असताना दोन पाच वर्षांच्या चिमुकलींच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली.
छत्रपती संभाजीनगर : निष्पाप वयातला खेळ एका क्षणात किती धोकादायक ठरू शकतो, याचा अंगावर शहारा आणणारा प्रकार शहरात घडला. वेगवेगळ्या ठिकाणी खेळत असताना दोन पाच वर्षांच्या चिमुकलींच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली. एका मुलीच्या डोळ्यात जमिनीवर पडलेली लोखंडी तार घुसली, तर दुसऱ्या मुलीच्या डोळ्याला चिंचेच्या काडीने जबर मार लागला. दोन्ही घटनांमध्ये डोळ्यांची इजा अत्यंत गंभीर स्वरूपाची होती. वेळेत उपचार मिळाले नसते, तर कायमस्वरूपी दृष्टी जाण्याचा मोठा धोका होता. सुदैवाने दोन्ही मुलींना एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नेत्र विभागातील डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने शस्त्रक्रिया केली. करण्यात आलेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे दोन्ही चिमुकलींची दृष्टी वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. वेळीच मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे दोन लहान जीवांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले.
पहिल्या घटनेत मिसारवाडी येथील रहिवासी असलेल्या 5 वर्षीय मुलीच्या डोळ्यात खेळताना जमिनीवर पडलेली लोखंडी तार थेट डोळ्यात शिरली. त्यामुळे बुब्बुळाला गंभीर जखम झाली. या मुलीवर तातडीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याने वेळेशी शर्यत होती.
advertisement
दुसऱ्या घटनेत शेंदूरवादा येथे चिंचेच्या झाडाखाली 5 वर्षीय चिमुकली खेळत होती. त्याच वेळी चिंच झाडावरून पडल्याने मुलीच्या डोळ्याला जोरदार दुखापत झाली. तपासणीमध्ये डोळ्यात लाकडी काडी अडकलेली असल्याचे आढळले. ही काडी अत्यंत नाजूक ठिकाणी अडकलेली असल्याने कोणतीही चूक मुलाच्या डोळ्याला कायमची दुखापत करू शकत होती. तातडीने शस्त्रक्रिया करून ती काडी काढली.
advertisement
या दोन्ही रुग्णांवर अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रविभाग प्रमुख डॉ. अर्चना वरे, डॉ. तपनजक्कल, डॉ. वेणूकुमार रंगू यांच्या सहकार्याने कॉर्नियातज्ज्ञ डॉ. महेश सोनपेठकर यांनी शस्त्रक्रिया केली. भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. गायत्री तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गणेश निकम, डॉ. आमेर सय्यद, डॉ. नियती सेठी, डॉ. आकाश यांनी सहकार्य केले. स्टाफ नर्स कालिंदी इधाटे, विकास गायकवाड आदींचेही योगदान आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 3:34 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
वय अवघे 5 वर्षे , एकीच्या डोळ्यात तार, दुसरीच्या काडी; डॉक्टरांनी निर्णय घेतला, अंधारात जाणारा जीव वाचला







