TRENDING:

Team India : युएसएविरुद्ध 3 चुका... आता झाल्या तर उलटफेर होणार, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये धाकधूक!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये रोमांचक सामने बघायला मिळत आहेत. अफगाणिस्तान, नेपाळ, नेदरलँड्स सारख्या छोट्या टीमनी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारतासारख्या वर्ल्ड चॅम्पियन टीमचा घाम काढला.
advertisement
1/6
युएसएविरुद्ध 3 चुका... आता झाल्या तर उलटफेर होणार, टीम इंडियाची धाकधूक वाढली!
टीम इंडिया वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात युएसएविरुद्ध अडचणीत आली होती. कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या अर्धशतकामुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला होता. या सामन्यात टीम इंडियाकडून बऱ्याच चुका झाल्या होत्या.
advertisement
2/6
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा दुसरा सामना नामिबियाविरुद्ध गुरूवारी होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला युएसएविरुद्ध केलेल्या 3 चुका सुधाराव्या लागणार आहेत, अन्यथा नामिबिया यंदाच्या वर्ल्ड कपमधला सगळ्यात मोठा उलटफेर करेल.
advertisement
3/6
नामिबिया जरी छोटी टीम असली आणि त्यांच्या खेळाडूंकडे अनुभव कमी असला तरी टीम इंडियाला त्यांना कमी लेखून चालणार नाही. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला संघर्ष करावा लागला होता.
advertisement
4/6
नामिबियाच्या बॉलरनी स्पर्धेत खेळलेल्या एकमेव सामन्यात चांगली बॉलिंग केली होती, त्यामुळे भारतीय बॉलरना सतर्क राहावं लागणार आहे.
advertisement
5/6
युएसएविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव वगळता टीम इंडियाची टॉप ऑर्डर अपयशी ठरली होती. अभिषेक शर्मा स्वस्तात आऊट झाला, तर इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक आणि रिंकूलाही मोठा स्कोअर करता आला नाही. 77 रनवरच भारताने 6 विकेट गमावल्या होत्या.
advertisement
6/6
7 ते 15 ओव्हरमध्ये भारतीय टीमची बॅटिंग खराब झाली. मोठे शॉट खेळण्याच्या नादात भारतीय बॅटर आऊट झाले, त्यामुळे मोठा स्कोअर होईल का नाही? याची चिंता सतावत होती. नामिबियाविरुद्ध भारताला मीडल ओव्हरमध्ये विकेट न गमावता रन करावे लागतील, ज्यामुळे डेथ ओव्हरमध्ये मोठा स्कोअर करता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : युएसएविरुद्ध 3 चुका... आता झाल्या तर उलटफेर होणार, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये धाकधूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल