IND vs PAK : अभिषेक आणि ईशान किशन बाहेर, संजू सॅमसनसोबत ओपनिंग कोण करणार? सूर्याचा प्लॅन बी काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Namibia, T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 मधील आपल्या दुसऱ्या मॅचसाठी भारतीय टीम सज्ज झाली असून आज गुरुवारी नामीबियाविरुद्ध मुकाबला रंगणार आहे.
advertisement
1/7

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या स्पर्धेत विजयी सुरुवात केली असून, आजची नामीबियाविरुद्धची मॅच जिंकून आपली विजयी लय कायम राखण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असेल.
advertisement
2/7
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. मात्र, टीम इंडियाला एक नव्हे तर दोन धक्के बसले आहेत. दोन्ही सलामीवीर फलंदाज जायबंदी झालेत. त्यामुळे सूर्यकुमार यादवला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
3/7
दुसरीकडे, नामीबियासाठी मॅच आव्हानात्मक असणार आहे, कारण त्यांना याच मैदानावर नेदरलँड्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे नामीबियाची टीम या मॅचमध्ये जोरदार पुनरागमन करण्याच्या उद्दिष्टाने मैदानात उतरेल.
advertisement
4/7
भारतासाठी मात्र सलामीवीर अभिषेक शर्माचा फिटनेस चिंतेचा विषय ठरत आहे. अभिषेकला पोटाचे इन्फेक्शन आणि ताप आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
advertisement
5/7
अभिषेकची तब्येत आता ठीक असल्याची माहिती आहे. परंतू त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील समावेशावर अद्याप कोणतीही माहिती नाही. जर अभिषेक फिट नसेल, तर संजू सॅमसनला ओपनिंगची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
6/7
सॅमसनकडे पॉवरप्लेमध्ये आक्रमक बॅटिंग करून टीमला मोठी धावसंख्या उभारून देण्याची क्षमता आहे, ज्यामुळे टीम इंडियाची ताकद वाढू शकते. तर दुसरीकडे बुमराहच्या यॉर्कर बॉलवर ईशान किशन जखमी झाला आहे.
advertisement
7/7
ईशान किशन खेळला नाही तर सूर्यकुमारला आपला प्लॅन बी तयार करावा लागेल. यानुसार तिलक वर्मा सलामीला येण्याची शक्यता आहे. भारतीय फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी म्हणजे स्टार बॉलर जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे फिट झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : अभिषेक आणि ईशान किशन बाहेर, संजू सॅमसनसोबत ओपनिंग कोण करणार? सूर्याचा प्लॅन बी काय?