TRENDING:

महाशिवरात्रीनिमित्त मोठा निर्णय, घारापुरीसाठी विशेष जलसेवा, तिकीट दर आणि वेळापत्रक

Last Updated:

Elephanta Ferry: घारापुरी येथील जगप्रसिद्ध शिवलिंग आणि ऐतिहासिक लेण्यांचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो शिवभक्त येथे दाखल होतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर घारापुरी (एलिफंटा) बेटासाठी रविवारी विशेष जलसेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. मोरा ते घारापुरी (राजबंदर) तसेच जेएनपीए बंदर ते घारापुरी या मार्गांवर बोटींची ये-जा सुरू राहणार असून भाविकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त मोठा निर्णय, घारापुरीसाठी विशेष जलसेवा, तिकीट दर आणि वेळापत्रक
महाशिवरात्रीनिमित्त मोठा निर्णय, घारापुरीसाठी विशेष जलसेवा, तिकीट दर आणि वेळापत्रक
advertisement

मोरा बंदरातून घारापुरीपर्यंतच्या जलप्रवासासाठी एकेरी तिकीट दर 65 रुपये निश्चित करण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दर कायम ठेवण्यात आल्याची माहिती मोरा बंदराचे अधिकारी नितीन कोळी यांनी दिली. जेएनपीए मार्गावरही प्रवासासाठी निर्धारित दर आकारण्यात येणार आहेत.

ST प्रवासात सवलत हवीये? NCMC कार्ड काढलंत का? महामंडळाचा मोठा निर्णय, कुणाला फायदा?

advertisement

घारापुरी येथील जगप्रसिद्ध शिवलिंग आणि ऐतिहासिक लेण्यांचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो शिवभक्त येथे दाखल होतात. मुंबई, नवी मुंबई, अलिबाग, न्हावा तसेच इतर किनारी भागांतूनही मोठ्या संख्येने भाविक बोटीने प्रवास करतात. या सर्व व्यवस्थेचे नियोजन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत करण्यात आले आहे. यासंदर्भात नुकतीच बोर्डाची बैठक पार पडली असून जलप्रवास सुरक्षाव्यवस्था आणि तिकीट दर यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

advertisement

View More

मोरा बंदरातून सर्वाधिक भाविक प्रवास करतात तर घारापुरी हे जेएनपीटी बंदरापासून सर्वांत जवळ असल्याने त्या मार्गालाही चांगला प्रतिसाद मिळतो. रविवारी जेएनपीटी जेट्टीवरून सकाळी 7 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत जलसेवा उपलब्ध असणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

दरम्यान, तिकीटाची भाडेवाढ रोखण्यासाठी प्रशासनाने एकेरी 65 रुपये दर निश्चित केला असून अतिरिक्त दर आकारणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक बोटीत कमाल 150 प्रवाशांपर्यंतच वाहतूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन सुविधा आणि बंदरावरील नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात येणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाने सर्वांना नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
महाशिवरात्रीनिमित्त मोठा निर्णय, घारापुरीसाठी विशेष जलसेवा, तिकीट दर आणि वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल