advertisement

ST प्रवासात सवलत हवीये? NCMC कार्ड काढलंत का? महामंडळाचा मोठा निर्णय, कुणाला फायदा?

Last Updated:

ST NCMC Card: एसटी महामंडळाकडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, पुरस्कारार्थी अशा सुमारे 35 प्रकारच्या प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात.

ST प्रवासात सवलत हवीये, NCMC कार्ड आहे का? कसं काढाय कुणाला फायदा?
ST प्रवासात सवलत हवीये, NCMC कार्ड आहे का? कसं काढाय कुणाला फायदा?
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एसटी बसमधील तिकीट खरेदी आणि विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) अनिवार्य करण्यात येणार आहे. हा निर्णय एसटी सेवा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि डिजिटल करण्याच्या दृष्टीने घेण्यात आला आहे.
या योजनेसाठी एसटी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेशी करार केला आहे. राज्यातील सर्व आगारांमध्ये लवकरच नोंदणी मोहीम सुरू होणार असून, प्रवाशांना टप्प्याटप्प्याने हे कार्ड दिले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
एनसीएमसी कार्ड का आवश्यक?
एसटी महामंडळाकडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, पुरस्कारार्थी अशा सुमारे 35 प्रकारच्या प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. परंतु काही ठिकाणी खोट्या ओळखपत्रांच्या आधारे सवलती घेतल्या जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे शासनाला आर्थिक नुकसान होत होते.
advertisement
हे गैरप्रकार थांबवण्यासाठी आणि योग्य व्यक्तीलाच सवलत मिळावी यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डमुळे प्रत्येक व्यवहाराची डिजिटल नोंद राहणार आहे. त्यामुळे सवलतींची अचूक माहिती, शासनाकडून मिळणारी परतफेड (प्रतिपूर्ती) आणि रोखविरहित व्यवहार एकाच प्रणालीतून होणार आहेत.
कोणाला कसे मिळणार कार्ड?
विद्यार्थी, शाळा व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले स्मार्ट कार्ड दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थी सवलतींची नोंद अचूक राहील.
advertisement
ज्येष्ठ नागरिक व महिला
अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधारशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
दिव्यांग प्रवासी
दिव्यांग प्रवाशांना त्यांच्या यूडीआयडी (UDID) क्रमांकाशी लिंक असलेले विशेष कार्ड दिले जाईल.
स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार व पुरस्कारार्थी
स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयामार्फत कार्ड वितरित केले जाईल.
नोंदणी प्रक्रिया कशी असेल?
प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यभरात 3000 पेक्षा जास्त अधिकृत एजंट नेमण्यात आले आहेत. बसस्थानकांवरच नोंदणी व कार्ड वितरणाची सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे प्रवाशांना वेगळी धावपळ करावी लागणार नाही.
advertisement
कार्डचे शुल्क आणि रिचार्ज
एनसीएमसी स्मार्ट कार्ड घेण्यासाठी प्रवाशांना 199 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. भविष्यात कार्ड जुने किंवा खराब झाल्यास ते परत जमा केल्यावर 149 रुपयांत नवीन कार्ड मिळणार आहे. तसेच कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी त्यामध्ये किमान 100 रुपयांची शिल्लक असणे अनिवार्य राहणार आहे.
कार्डचा रिचार्ज 50 रुपयांच्या पटीत करता येणार असून, त्यासाठी ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल ॲप तसेच नियुक्त अधिकृत एजंट यांच्या माध्यमातून सहजपणे रिचार्जची सुविधा उपलब्ध असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ST प्रवासात सवलत हवीये? NCMC कार्ड काढलंत का? महामंडळाचा मोठा निर्णय, कुणाला फायदा?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement