advertisement

'अर्जितचा खून झालाय, लवकर ये', भाऊ चाकू घेऊन आला अन् दोघांचा केला खेळ खल्लास, नांदेडच्या गँगवॉरमध्ये काय घडलं?

Last Updated:

नांदेड शहरात शुक्रवारी मध्यरात्री रक्तरंजित राडा झाला आहे. इथं गँगवॉरमधून तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

nanded triple murder
nanded triple murder
नांदेड शहरात शुक्रवारी मध्यरात्री रक्तरंजित राडा झाला आहे. इथं गँगवॉरमधून तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दबा धरून बसलेल्या एका टोळीने दुसऱ्या टोळीवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. यानंतर भडकलेल्या टोळीयुद्धात मृताच्या भावाने दोन जणांचा खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. एकाच रात्री तीन जणांची अशाप्रकारे हत्या झाल्याने नांदेड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
अर्जितसिंग चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ असं हत्या झालेल्या तिघांची नावं आहेत. अर्जितसिंग चव्हाण हा नांदेडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून ते 'सदा' नावाची गुन्हेगारी टोळी चालवतो. तर अरबाज आणि आवेझ हे 'साई लाला' टोळीचे सदस्य आहेत. शुक्रवारी मध्यरात्री साई लाला टोळीने अर्जितसिंग चव्हाणला मारण्यासाठी दबा धरला होता. त्यांनी तलवारी वार करत अर्जितला संपवलं देखील. मात्र त्यानंतर उफाळलेल्या टोळीयुद्धात अरबाज आणि आवेझचा देखील खून झाला.
advertisement

नांदेडमध्ये शुक्रवारी मध्यरात्री काय घडलं?

शुक्रवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कॅनॉल रोड परिसरात दोन टोळ्यांमध्ये वाद झाला. अर्जितसिंग चव्हाण हा धुरंधर-२ चित्रपट पाहून अन्य दोघांसह दुचाकीने घराकडे जात होता. त्याच्यावर सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहंमद अरबाज आणि इतर काही हल्लेखोरांनी तलवार आणि खंजीरने हल्ला केला. त्यात अर्जितसिंग चव्हाणचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या साथीदारांनी प्रतिकार केल्याने मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ हे दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले.
advertisement

सरकारी रुग्णालयात रक्ताचा सडा

हल्लेखोरांना सरकारी रुग्णालयात दाखल केल्याची बाब मृत अर्जितसिंगचा धाकटा भाऊ राजेशला समजली. तो सरकारी रुग्णालयातील अपघात विभागात गेला. त्याने जखमी सय्यद आवेज सय्यद खलील आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख यांना चाकूने वार करत मारले. त्यात या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
advertisement

दोन्ही टोळ्यांत वर्चस्वातून धुसफूस

काही महिन्यांपासून दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्ववाद सुरू होता. यापूर्वीदेखील दोन्ही टोळ्यांचे सदस्य आमने सामने आले होते, परंतु त्यांच्यात खुनी हल्ला टळला होता. चव्हाण याच्यावर अत्यंत नियोजनपूर्वक हल्ला झाल्याने या कटात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'अर्जितचा खून झालाय, लवकर ये', भाऊ चाकू घेऊन आला अन् दोघांचा केला खेळ खल्लास, नांदेडच्या गँगवॉरमध्ये काय घडलं?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement