राजपाल यादवने याआधी दोनवेळा खाल्लीय जेलची हवा, 3 महिन्याच्या तुरुंगवासात सुरू केलेलं 'हे' काम, जेलरही झालेले हैराण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rajpal Yadav Cheque Bounce Case: बॉलिवूड फिल्म्समधून सगळ्यांना खळखळून हसवणारा हा अभिनेता आज कोठडीत आहे, हे पाहून त्यांचे चाहते हळहळत आहेत. मात्र, राजपाल यांच्यासाठी जेल ही काही नवीन जागा नाही.
advertisement
1/8

९ कोटींच्या थकीत कर्ज प्रकरणात अडकलेले राजपाल यादव सध्या तिहार जेलमध्ये आहेत. बॉलिवूड फिल्म्समधून सगळ्यांना खळखळून हसवणारा हा अभिनेता आज कोठडीत आहे, हे पाहून त्यांचे चाहते हळहळत आहेत. मात्र, राजपाल यांच्यासाठी जेल ही काही नवीन जागा नाही.
advertisement
2/8
यापूर्वी २०१८ मध्येही त्यांना ३ महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. पण राजपाल यादव यांचं व्यक्तिमत्त्व असं आहे की, त्यांनी त्या काळोख्या कोठडीतही कलेचा प्रकाश पसरवला होता. तुरुंग म्हणजे गुन्हेगार, अंधार आणि नैराश्य... पण राजपाल यांनी हे समीकरणच बदलून टाकलं.
advertisement
3/8
२०१८ मध्ये जेव्हा ते जेलमध्ये होते, तेव्हा त्यांनी तिथे बसून रडण्यापेक्षा काहीतरी क्रिएटिव्ह करायचं ठरवलं. तिथे अनेक तरुण गुन्हेगार असे होते जे मानसिकदृष्ट्या खचले होते. राजपाल यांनी जेल प्रशासनाची परवानगी घेतली आणि त्या कैद्यांसाठी चक्क थिएटर वर्कशॉप सुरू केली.
advertisement
4/8
ज्या मुलांच्या आयुष्यातून संगीत, गाणी आणि हास्य हरवलं होतं, त्यांना राजपाल यांनी अभिनयाचे धडे दिले. राजपाल सांगतात, "माझा स्वभाव आहे की मी जंगलात गेलो तरी तिथे मंगल करतो. मी तिथल्या तरुणांना कलेशी जोडलं. दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागलं. आम्ही त्या भिंतींना जिवंत केलं होतं."
advertisement
5/8
राजपाल यांच्या या शिस्तीमुळे आणि सकारात्मकतेमुळे जेलचे सुपरिटेंडंट इतके प्रभावित झाले की, जेव्हा राजपाल ३ महिन्यांनी बाहेर आले, तेव्हा त्यांना चक्क दोन कॅरेक्टर सर्टिफिकेट्स देऊन सन्मानित करण्यात आलं.
advertisement
6/8
सुपरिटेंडंट साहेब राजपाल यांना म्हणाले होते की, "गेल्या ७०-१०० वर्षांच्या इतिहासात इथे अनेक मोठे नेते आणि गुन्हेगार आले, पण तुमच्यासारखा माणूस पाहिला नाही. आम्हाला वाटलं होतं तुम्ही रोज तक्रारी कराल, पण तुम्ही तर पूर्ण जेलच बदलून टाकलं. तुमच्या शिस्तीने आम्हाला प्रेरणा दिली." राजपाल यांनी जेलमधील प्रत्येक नियम पाळला आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं.
advertisement
7/8
जेव्हा राजपाल जेलमधून बाहेर आले, तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, लोक तुम्हाला जज करतायत असं वाटतंय का? त्यावर राजपाल यांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिलं.
advertisement
8/8
ते म्हणाले, "जर तुमच्या नजरेत चोर असेल, तर लोक तुम्हाला पक्का जज करतील. पण जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नजरेत झुकलेले नसाल, तर देवाशिवाय कोणासमोरही वाकण्याची गरज नाही. तुमची विवेकबुद्धी जागा ठेवा आणि जगासमोर आव्हान बनून उभे राहा!"<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राजपाल यादवने याआधी दोनवेळा खाल्लीय जेलची हवा, 3 महिन्याच्या तुरुंगवासात सुरू केलेलं 'हे' काम, जेलरही झालेले हैराण