IND vs PAK : पाकिस्तानविरूद्ध सामन्याआधीच टीम इंडियाचा प्लान लीक,गंभीरचे 5 छावे गोलंदाजांचा कोथळा काढणार,रायव्हलरी 8-1 होणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
येत्या 15 फेब्रुवारी 2026 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेच्या आर.प्रेमदासा स्टेडिअमवर हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे.या सामन्याआधी टीम इंडियाचा वर्ल्डकप प्लान लीक झाला आहे.
advertisement
1/7

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आज टीम इंडिया दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर नामिबियाशी भिडणार आहे. या स्पर्धेला आता काही तासात सुरुवात होणार आहे.
advertisement
2/7
नामिबीया विरूद्ध सामन्याआधी टीम इंडियाचा स्टार खेळाडू तिलक वर्मा याची पत्रकार परिषद पार पडली होती.या पत्रकार परिषदेत बोलता बोलता तिलक वर्माने टीम इंडियाचा वर्ल्ड कपचा अख्खा प्लानच फोडला होता.
advertisement
3/7
टीम इंडियाच्या संघातील तीन खेळाडूंना बिनधास्त खेळण्याची मुभा देण्यात आली आहे.या खेळाडूंना मैदानात येऊन फक्त बिनधास्त बॅटींग करायची आहे.या व्यतिरीक्त तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर उतरणाऱ्या खेळाडूंना अँकरची भूमिका बजावायची आहे.
advertisement
4/7
याचा अर्थ टीम इंडियाचे तीन खेळाडू म्हणजे, अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि संजू सॅमसन आहेत. या तिघांपैकी जे खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील.त्यापैकी दोन खेळाडूंना मैदानात उतरल्यावर विकेटची पर्वा न करता बिनधास्त चौकार आणि षटकार मारत फलंदाजी करायची आहे.
advertisement
5/7
जर प्लान यशस्वी ठरला आणि ताबडतोड खेळी करण्याच्या प्रयत्नात खेळाडू आऊट झाले तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माला मैदानात येऊन भारताचा डाव सावरून रनरेट खाली न जाता तसाच धावता ठेवायची जबाबदारी असणार आहे.
advertisement
6/7
टी20 क्रिकेटमध्ये 6 ते 16 दरम्यान चांगली फलंदाजी करणारा संघ नेहमीच जिंकतो. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर येणाऱ्या खेळाडूंना दबाव रोखण्याचा रोल मिळाला आहे. जर लवकर विकेट पडले तर एक दोन ओव्हर खेळून डाव सांभाळणे गरजेचे आहे,असे गौतम गंभीरला वाटते.
advertisement
7/7
दरम्यान भारताचा असा वर्ल्डकपसाठीचा प्लान आहे, जो आता लीक झाला आहे.त्यामुळे आता टीम इंडियाचा हा प्लान पाहून पाकिस्तानी टीम आता कशी रणनीती आखते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानविरूद्ध सामन्याआधीच टीम इंडियाचा प्लान लीक,गंभीरचे 5 छावे गोलंदाजांचा कोथळा काढणार,रायव्हलरी 8-1 होणार?