TRENDING:

Mahashivratri 2026: तब्बल 300 वर्षांनी महाशिवरात्री दिवशी दुर्मिळ योगायोग; या भाग्यवान राशींचे नशीब पालटणार

Last Updated:

Mahashivratri 2026 : यंदाच्या महाशिवरात्रीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 300 वर्षांनंतर एकाच वेळी पाच दुर्मिळ राजयोग जुळून येत आहेत. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने असा संयोग अत्यंत दुर्मिळ मानला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : यावर्षीची महाशिवरात्री खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणांपैकी एक असलेल्या या दिवशी भगवान शिवाची आराधना केली जाते. यंदा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजून 4 मिनिटांनी सुरू होणार असून ती 16 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजून 34 मिनिटांनी संपेल.
News18
News18
advertisement

यंदाच्या महाशिवरात्रीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 300 वर्षांनंतर एकाच वेळी पाच दुर्मिळ राजयोग जुळून येत आहेत. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने असा संयोग अत्यंत दुर्मिळ मानला जातो. यामध्ये बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होत आहे. तसेच बुध आणि सूर्याच्या एकत्र येण्याने बुधादित्य राजयोग तयार होत असून सूर्य आणि शुक्राच्या संयोगातून शुक्रादित्य योग बनत आहे. कुंभ राशीत शनि स्वतःच्या शश महापुरुष राजयोगात विराजमान आहे. विशेष म्हणजे कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध, शुक्र, शनि आणि राहू हे पाच ग्रह एकत्र येत असल्याने एक शक्तिशाली पंचग्रह राजयोगही तयार होत आहे. कुंभ राशीच्या लोकांना याचा फायदा मिळणार आहे.

advertisement

विरोधकांचा टांगा पलटी..! विजया एकादशीला केलेल्या या गोष्टी शत्रुंवर विजय मिळवतात

महाशिवरात्रीला शिवलिंगाचे पूजन करणे हे पंचतत्वांच्या उपासनेसारखे मानले जाते. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पाच तत्वांचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाचा अभिषेक या दिवशी अतिशय शुभ फलदायी ठरतो. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी या दिवशी सकाळी स्नान उरकून शिवमंदिरात जाऊन अभिषेक करावा. दूध, दही, मध, तूप आणि साखर यांपासून बनवलेल्या पंचामृताने अभिषेक केल्यास शिवाची विशेष कृपा प्राप्त होते.

advertisement

महाशिवरात्रीला इतक्या तासांचा भद्रकाळ! महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेकाची वेळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कधी थालीपीठ पिझ्झा खाल्ला का? खवय्यांची असते गर्दी, ट्राय तर करा
सर्व पहा

अनेक भक्त या दिवशी व्रत करतात, रात्रभर जागरण करून 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करतात आणि ध्यान लावतात. 300 वर्षांनंतर आलेल्या या पाच शुभ योगांच्या प्रभावामुळे या पवित्र रात्री केलेली शिवभक्ती जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येईल, अशी श्रद्धा आहे.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Mahashivratri 2026: तब्बल 300 वर्षांनी महाशिवरात्री दिवशी दुर्मिळ योगायोग; या भाग्यवान राशींचे नशीब पालटणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल