advertisement

Mahashivartri 2026: महाशिवरात्रीला इतक्या तासांचा भद्रकाळ! महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त कधी?

Last Updated:

Mahashivartri 2026: महाशिवरात्रीला जलाभिषेकासाठी दिवसभर अनेक शुभ मुहूर्त आहेत. सकाळी 08:24 ते 09:48 पर्यंत पहिला मुहूर्त, त्यानंतर 09:48 ते 11:11 पर्यंत दुसरा मुहूर्त असेल. सकाळी 11:11 ते दुपारी 12:35 पर्यंतचा 'अमृत सर्वोत्तम मुहूर्त' हा जलाभिषेकासाठी अत्यंत फलदायी मानला जातो.

News18
News18
मुंबई : माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला दरवर्षी महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. यावर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी येत आहे. यावेळेस महाशिवरात्रीला भद्रकाळ असला तरी, भाविकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण भद्रेचा वास पाताळ लोकात असल्याने त्याचा पृथ्वीवर कोणताही अशुभ परिणाम होणार नाही.
महाशिवरात्री 2026: भद्रकाळ आणि मुहूर्त
पंचांगानुसार, 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 05:04 वाजता भद्रा सुरू होईल आणि 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 05:23 वाजता संपेल. सुमारे 12 तास 19 मिनिटांचा हा काळ असला तरी, ज्योतिषांच्या मते पाताळातील भद्रेचा मानवी जीवनावर किंवा पूजाविधीवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही. त्यामुळे भक्त कोणत्याही शंकेशिवाय भगवान शिवाची पूजा आणि जलाभिषेक करू शकतात.
advertisement
जलाभिषेकाचे शुभ मुहूर्त - महाशिवरात्रीला जलाभिषेकासाठी दिवसभर अनेक शुभ मुहूर्त आहेत. सकाळी 08:24 ते 09:48 पर्यंत पहिला मुहूर्त, त्यानंतर 09:48 ते 11:11 पर्यंत दुसरा मुहूर्त असेल. सकाळी 11:11 ते दुपारी 12:35 पर्यंतचा 'अमृत सर्वोत्तम मुहूर्त' हा जलाभिषेकासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. जे भाविक संध्याकाळी पूजा करू इच्छितात, त्यांच्यासाठी संध्याकाळी 06:11 ते 07:47 ही वेळ उत्तम असेल.
advertisement
जलाभिषेक करण्याचा शास्त्रोक्त विधी - महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसून 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करत दिवा लावावा. तांब्याच्या किंवा मातीच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडे गंगाजल, कच्चे दूध किंवा मध मिसळून शिवलिंगावर सावकाश जल अर्पण करावे. जल अर्पण करताना ते शिवलिंगावरून व्यवस्थित प्रवाहित होईल याची काळजी घ्यावी.
advertisement
त्यानंतर शिवलिंगावर तीन पानांचे बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले किंवा रुईची फुले अर्पण करावीत. बेलपत्र वाहताना त्याचे देठ आपल्या दिशेला नसेल हे लक्षात ठेवावे. चंदनाचा टिळक लावून धूप-दीप दाखवावा. पूजेदरम्यान किमान 108 वेळा 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करावा आणि शक्य असल्यास शिवचालीसा किंवा रुद्राष्टकाचे पठण करावे. शेवटी शांत मनाने महादेवासमोर आपली मनोकामना व्यक्त करून आशीर्वाद घ्यावा.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याचा आम्ही दावा करत नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivartri 2026: महाशिवरात्रीला इतक्या तासांचा भद्रकाळ! महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त कधी?
Next Article
advertisement
अजितदादांचा उमेदवार ठरला 'जायंट किलर', दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव; कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ, संपूर्ण राज्यात चर्चा
Kolhapur ZP: अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर, दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव
  • अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर

  • जिल्हा परिषद निकालांनी नवं गणित

  • कोल्हापूरमधील निकालांने धक्का

View All
advertisement