Mumbai Amravati Express Accident : जळगावात मुंबई-अमरावती एक्सप्रेसचा अपघात, पहाटे 4 वाजता नेमकं काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mumbai Amravati Express Accident : गेल्या काही दिवसात रेल्वे अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच आता जळगावजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
1/7

गेल्या पाच वर्षांत, 200 रेल्वे अपघातांमध्ये 351 जणांचा मृत्यू झाला आणि 970 जण जखमी झाले, असं भारतीय रेल्वेने 17 रेल्वे झोनमधून शेअर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येतंय.
advertisement
2/7
अशातच आता जळगावातून मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे चार वाजता हा अपघात घडला आहे.
advertisement
3/7
बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक थेट ट्रॅकवर आल्याने मुंबई अमरावती एक्सप्रेस ट्रकला धडकल्याची घटना घडली आहे.
advertisement
4/7
बोदवड रेल्वे स्थानकावर पहाटे 4 वाजता ही घटना घडली. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
5/7
पहाटे 4 वाजल्यापासून मुंबई हावडा मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना संकटाचा सामना करावा लागतोय.
advertisement
6/7
अमरावती एक्सप्रेसच्या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार आहे. तसेच जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतीये.
advertisement
7/7
दरम्यान, गेल्या तीन तासांपासून प्रवासी अडकले आहेत. रेल्वे प्रवाशांना माहिती देत नाही, अशी तक्रार प्रवाशांनी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Mumbai Amravati Express Accident : जळगावात मुंबई-अमरावती एक्सप्रेसचा अपघात, पहाटे 4 वाजता नेमकं काय घडलं?