Nagpur Weather: वादळी पाऊस झोडपणार, नागपूरसह विदर्भात अलर्ट, 72 तास महत्त्वाचे!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भातील गेल्या काही दिवसांपासून आस्मानी संकट घोंघावत आहे. आज पुन्हा नागपूरसह 7 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/5

गेले काही दिवस राज्यात पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे. नागपूरसह विविध ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज 9 मे रोजी सुद्धा विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे उन्हाच्या झळा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.
advertisement
3/5
अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याठिकाणी पावसाचा कोणताही अलर्ट नाही. तरीही उष्णता आणि दमट हवामानामुळे त्रास होऊ शकतो.
advertisement
4/5
नागपूर, अकोला आणि चंद्रपूर येथे कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वर्धा आणि गोंदिया येथेही तापमान 38 अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे, तर बुलढाणा आणि अमरावतीमध्ये तुलनेने तापमान थोडेसे कमी राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
विदर्भात पुढील 3 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 10 मेपासून सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तसेच विजांचा धोका असल्याने नागरिकांनी गरज नसल्यास वादळी वातावरणात बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Weather: वादळी पाऊस झोडपणार, नागपूरसह विदर्भात अलर्ट, 72 तास महत्त्वाचे!