TRENDING:

Nagpur Weather: वादळी वारे अन् अवकाळी संकट, विदर्भात पुन्हा अलर्ट, 24 तास महत्त्वाचे!

Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भातील 7 जिल्ह्यांन आज पुन्हा वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
advertisement
1/5
Nagpur: वादळी वारे अन् अवकाळी संकट, विदर्भात पुन्हा अलर्ट, 24 तास महत्त्वाचे!
मे महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यातील तापमानात मोठे बदल घडून आलेत. सद्यस्थितीमध्ये राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांत विदर्भासह इतरही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. आज 8 मे रोजी सुद्धा विदर्भात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/5
विदर्भात पुढील काही दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. आज पुन्हा 7 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, वर्धा आणि गोंदिया या ठिकाणी दुपारी किंवा सायंकाळनंतर सामान्यतः ढगाळ वातावरण राहील. या भागांमध्ये तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/5
अमरावती, अकोला, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअसदरम्यान राहील. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 39 अंश तापमानाचा अंदाज आहे.
advertisement
4/5
गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना 8 मे साठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानातील या बदलांनुसार खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः विजांच्या गडगडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
5/5
वादळी वाऱ्यासह पावसामुळं शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. फळगळ आणि इतरही शेतीचे जे नुकसान होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी काही नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Weather: वादळी वारे अन् अवकाळी संकट, विदर्भात पुन्हा अलर्ट, 24 तास महत्त्वाचे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल